घटक २
शारीरिक व बौद्धिक विकास
अध्ययन निष्पत्ती
छात्राध्यापक -
१. नवजात बालके व शाळापूर्व बालकातील शारीरिक विकासाची
कौशल्ये सांगतो.
२. किशोरावस्थेतील बालकातील शारीरिक विकासाची कौशल्ये
सांगतो.
३. कौमार्यावस्थेतील बालकातील शारीरिक विकासाची कौशलय
सांगतो.
४. बालकाच्या विकासासंदर्भात पालकाची भूमिका स्पष्ट करतो.
५. बालकाच्या विकासासंदर्भात शिक्षकाची भूमिका स्पष्ट करतो.
६. खेळासारख्या कृतीतून विकसित होणाऱ्या शारीरिक कौशल्याचे
महत्त्व सांगतो.
७. बालकाला विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याविषयी माहिती
स्पष्ट करतो.
८. मेंदू आधारित अध्ययन व त्यातील शिक्षक भूमिका सांगतो.
घटक २
शारीरिक व बौद्धिक विकास
अध्ययन निष्पत्ती
छात्राध्यापक -
9. नवजात बालके व शाळापूर्व बालकातील शारीरिक विकासाची
कौशल्ये सांगतो.
२. किशोरावस्थेतील बालकातील शारीरिक विकासाची कौशल्ये
सांगतो.
३. कौमार्यावस्थेतील बालकातील शारीरिक विकासाची कौशलय
सांगतो.
४. बालकाच्या विकासासंदर्भात पालकाची भूमिका स्पष्ट करतो.
५. बालकाच्या विकासासंदर्भात शिक्षकाची भूमिका स्पष्ट करतो.
६. खेळासारख्या कृतीतून विकसित होणाऱ्या शारीरिक कौशल्याचे
महत्त्व सांगतो.
७. बालकाला विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याविषयी माहिती
स्पष्ट करतो.
८. मेंदू आधारित अध्ययन व त्यातील शिक्षक भूमिका सांगतो.
९. क्रीडेमुळे बौद्धिक विकासात भर पडते हे सांगतो.
१०. बालकाच्या विविध अवस्थेतील शारीरिक विकासाची कौशल्ये
लक्षात घेऊन त्यांना संधी देतो.
११. विविध खेळांचे आयोजन करून शारीरिक कौशल्ये विकसित
करतो.
. क्रीडेमुळे बौद्धिक विकासात भर पडते हे सांगतो.
१०. बालकाच्या विविध अवस्थेतील शारीरिक विकासाची कौशल्ये
लक्षात घेऊन त्यांना संधी देतो.
११. विविध खेळांचे आयोजन करून शारीरिक कौशल्ये विकसित
करतो.
१२. बालकाला मेंदू आधारित अध्ययन करण्याची संधी उपलब्ध करून
देतो.
१३. शालेय पातळीवर विविध उपक्रमांचे आयोजन करून शारीरिक
कौशल्ये विकसित करतो.
१४. बालकाच्या शारीरिक विकासासंदर्भात पालकांशी सुसंवाद साधतो.
(अ) नवजात बालके आणि शाळापूर्व बालकांच्या शारीरिक विकासाची
वैशिष्ट्ये
यापूर्वी आपण शैशव अवस्था ज्याला म्हटले आहे त्यामध्ये नवजात बालके आणि शाळापूर्व बालके यांचा समावेश करण्यास हरकत नाही. बालक जन्माला आल्यानंतर सुरुवातीच्या काही काळाला 'नवजात बालके' असे संबोधले जाते आणि पहिलीत प्रवेश
मिळविण्यासाठी वयाची ६ वर्षे पूर्ण होणे आवश्यक असल्याने शाळापूर्व बालकाचे वय ६ वर्षापर्यंतचे समजावे लागते. म्हणून नवजात बालक व शाळापूर्व बालक या दोन्हींचा समावेश शैशव अवस्थेत केला जातो. या दोन्हींमध्ये फरक करणे फारच सूक्ष्मपणाचे व कृत्रिमपणाचे होईल.
श्वसन, अभिसरण, पचन व शरीर तापमान नियंत्रित करण्याची क्षमता नवजात
बालकात जन्मतः निर्माण होते. बाळ जन्मल्यानंतर सुरुवातीस त्याचे डोके मोठे, मान लहान, खांदे अरुंद असलेले दिसतात. हात, पाय तसेच धड हे डोक्याच्या तुलनेने लहान असते. अस्थी लवचीक असतात. त्याचा चेहरा झपाट्याने बदलत असतो. स्नायूंची वाढ झपाट्याने होते. मज्जातंतूची वाढही झपाट्याने होते. उंची, वजन व आकार वेगाने वाढलेला दिसतो. उंचीवर अनुवंशाचा आणि वजनावर परिस्थितीचा विशेष परिणाम झालेला आढळून येतो. 'जसे पोषण तशी वाढ' हे तत्त्व येथे लागू पडते.
कारक विकास म्हणजे शरीराच्या विविध हालचाली करण्यासाठी हालचाली वेगात,अचूकपणा व सफाईदारपणा येतो. व्यक्तीच्या विविध हालचाली कारकशक्तीच्या विकासावर अवलंबून असतात. बालकाची हालचाल डोक्याकडून पायाकडे होत असते.म्हणून बालक प्रथम डोके उचलते व नंतर पायावर उभे राहते.
बालकाच्या सुरुवातीच्या हालचाली स्थूल किंवा ओबडधोबड स्वरूपाच्या असतात. नंतर सराव व प्रशिक्षणामुळे त्याच्या हालचालीत नेमकेपणा येतो. उदा. सुरुवातीस एखादे खेळणे ओढून घ्यावयाचे असले तर बालक सर्व शरीराची, सर्व अवयवांची, दोन्ही हातांची हालचाल करून ते खेळणे आपल्याकडे ओढून घेते. परंतु नंतर मात्र हाताच्या
नेमक्या बोटांचा उपयोग करून खेळणे घेतले जाते.
0 टिप्पण्या