calendar

header ads

प्रेमाचा अध्याय

प्रेमाचा अध्याय

मी पुढच्या बाकांवर

ती बाजूच्या बाकावर होती..

मी तिच्या कडे बघायचो

ती मला सोडून फळ्यावर बघायची..

हे बघून मास्तरांची हटायाची

धबूका खायची ती वेळ असायची..

बोलो कधी तुझ्यावर प्रेम आहे

तर इंग्रजीत रागाने पुटपटाची

गण्याला विचारले काय बोली

पट्टा म्हणे आता हीच वेळ आहे

I love you म्हणायाची.

बाजूला बाप्पाचा वर्ग होता चालू

माझ्या प्रेमाचा वणवा लागला हळूहळू पटू

बाप ही गेला राजे हो लय भडकू

असा सगळ्या समोर मला धुतला

माझ्या प्रेमाचा तो अध्याय संपला..

मग कळले मला सारे

करता करविता गण्याच होता.

तिच्या आणि त्याच्या महायुतीचा

फक्त हा सराव होता

फक्त हा सराव होता..
🌹🌹🌹🌹🌹

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या