मुठीतले दाणें तुझ्या संपण्या आधी,
गाणे एक आळवून ठेव
वाट चुकलेली पाखरं येतील तुझ्याही दारात.
रात्र मोहरण्या आधी,
ओढाळ मन तू जपून ठेव
शिंपेल आभाळ चांदणं कधी तुझ्याही घरात
आभाळ भरून येण्या आधी
कविता एक आठवून ठेव
स्वरांचा फ़ुटेल झरा कधी तुझ्याही अंतरात
गाणे एक आळवून ठेव
वाट चुकलेली पाखरं येतील तुझ्याही दारात.
रात्र मोहरण्या आधी,
ओढाळ मन तू जपून ठेव
शिंपेल आभाळ चांदणं कधी तुझ्याही घरात
आभाळ भरून येण्या आधी
कविता एक आठवून ठेव
स्वरांचा फ़ुटेल झरा कधी तुझ्याही अंतरात
0 टिप्पण्या