calendar

header ads

✒ तु गेल्यापासून ✒

✒  तु गेल्यापासून  ✒
सुयॅ मावळला केंव्हाच,
चंद्र आडोशाला लागलाय,
चांदणही धुसर झालंय,
अन दवबिंदूना आसवांचे रूप आलंय,
अन तु कोणत्या विश्वात हरवलायसं!

मन हे प्राजक्तापरी कुजले आहे,
विरहात सख्या रे तुझ्या जगत आहे,
काळोख भस्म अंतरीचा पसरला आहे,
प्रत्येक झाड-दृम-पान आसुसले!

तटीनी आता वाहुन निघाल्यात,
सारे स्वप्न धुसर झाले नौकापार करत,
तु गेल्यापासून सारं सरलं होत,
मनीचं  आता घरपन करायचं ठरलं होतं!

तु तर विदेशी निघुन गेलास,
पावलाना आता रस्ता दिसतं नव्हता,
स्मशानात जागा मिळेल शेवटी,
हळू-हळू  श्वास थबकत होता?
               तु गेल्यापासून....
               तु गेल्यापासून....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या