शिवदिनविशेष
शिवकालीन इतिहास
९ फेब्रुवारी इ.स.१६५८
तुंग-तिकोना गडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. परंतु पंधराव्या शतकाच्या अखेरीस, मलिक अहमद निजामशहा याने इ.स. १४८२-८३ च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नर चा बराचसा प्रांत आला त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला. नंतर त्याने आपले सैन्य तुंग व तिकोना गडांकडे वळविला.इ.स. १५८५ मध्ये मलीक अहमद निजामशाहने हा किल्ला जिंकुन निजामशाहीत आणला. इ.स. १६५८ मध्ये शिवाजी महाराजांनी तुंग- तिकोना किल्ला जिंकुन परत स्वराज्यात आणला
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
९ फेब्रुवारी इ.स.१६६५
छत्रपती शिवरायांनी विजापूरच्या आदीलशहाचे "बिदनूर" शहर छापा घालून लुटले. महाराजांनी बिदनूरची स्वारी ही जलमार्गाने जाऊन केली होती. राजांनी नौकानयन करून सागर उल्लंघू नये ही हिंदू धर्माची खुळचट रूढी उधळून लावली. शिवराय हिंदू धर्मातील परंपरांचा सन्मान करत होते पण धर्मातील खुळचट रूढी परंपरांना आपल्या चरीत्रात मुळीच थारा दिला नाही.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
९ फेब्रुवारी इ.स.१६७०
"छत्रपती शिवराय" व "पोर्तुगीज" याच्यात तह झाला.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
९ फेब्रुवारी इ.स.१६८९
मुघल सरदार "मुकर्रबखान" याने "छत्रपती संभाजी महाराज" यांना कैद केले. संभाजी महाराजांच्या हत्ये नंतर अवघ्या १४ व्या दिवशीच रायगडास वेढा पडला. यावेळी रायगडचे किल्लेदार होते चांगोजी काटकर आणि त्यासोबत गडावर होते येसाजी कंक.संभाजी महाराज पकडले गेल्याची बातमी रायगडावर पोहोचताच अवघ्या ८ दिवसाताच राजाराम महाराजांना नजरकैदेतून सोडून किल्ले रायगडावर "महाराणी येसूबाई" व किल्ल्यावरील मराठी सरदारांच्या सल्ल्याने राजाराम महाराजांचे "मंचकारोहन" झाले.
स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम मराराजांचा राजाभिषेक दिन.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
जय गडकोट
!! हर हर महादेव !!



0 टिप्पण्या