शिवदिनविशेष
शिवकालीन इतिहास
१० फेब्रुवारी इ.स.१६७०
छत्रपती शिवरायांशी पोर्तुगिजांनी तह केला.
⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
१० फेब्रुवारी इ.स.१६६५
सिद्दी कसीम व सिद्दी खैरात यांनी दंडराजपुरी मराठ्यांकडुन जिंकली व या दिवशी होळी पोर्णिमा होती.१६६९ च्या मोहीमेत अपयश हाती आले पण महाराजांनी जिंकलेल्या भागाची चोख व्यवस्था ठेवली होती तसेच दंडराजपुरीला आरमारी गलबतांचा काफीला सज्ज ठेवला होता.१६७१ च्या सुमारास महाराजांनी परत जंजिर्याची मोहीमहाती घेतली, जंजीरा फत्ते करणार्यास त्यांनी १ मण सोन्याचे बक्षीस देण्याचे ठरविले होते, जंजिर्याहुन३ कोसांवर महाराजांचा तळ होता व त्याच रात्री दंड्याच्या ठाण्यावरती छुपा हल्ला करण्यास सिद्दी कासीम तयारी करत होता हे ठाणे म्हणजेच किनार्यावरील किल्ला. मराठी फौज किल्ल्यावर तैनाद होती, सिद्दी कासीम समुद्रामार्गे तर सिद्दी खैरात जमिनीमार्गे असा दुतर्फा हल्ला करण्याची कासीमची योजना होती. होळीचा सण असल्याने गस्तीच्या सैनीकाशिवाय किल्ल्यातील फौज बेसावध होती व कासीमच्या नावा किल्ल्याच्या तटाला लागताक्षणी खैरातने किल्ल्यावरहल्ला चढवला.सहाजीकच किल्ल्याची ताकद हा हल्ला थोपवण्यासाठी गेली व त्यामुळे समुद्राच्या दिशेने होणार्या हमल्याकडे दुर्लक्ष झाले तटाला शिड्या लावुन कासीमची फौज किल्ल्यावर आली व एकच कल्लोळ माजला, दरम्यान किल्ल्यावरील दारुगोळा कोठारात स्फोट झाला व प्रचंड धुर उसळला.शांततेत कासीमची ललकारी गुंजली परत लढाईला तोंड फुटले, मराठे सैनीक कमी पडत होते या रणकंदणात मराठी फौजेचा धुव्वा उडवत सिद्दी कासीम विजयी झाला व दंडराजपुरी मराठ्यांकडुन गेली.
⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
जय गडकोट
!! हर हर महादेव !!
🚩 ⛳⛳मराठा⛳⛳🚩


0 टिप्पण्या