calendar

header ads

मासिक पाळी

मासिक पाळी ...आजच्या मुलींची / महिलांची समस्या
===============================

ऋतुस्त्राव म्हणजे गर्भाशयाचे अस्तर (एंडोमेट्रियम) बाहेर टाकले जाण्याची क्रिया होय. ह्या सह रक्तदेखील वाहते. प्रत्येक स्त्रीच्या पुनरुत्पादनक्षम जीवनकाळात, गरोदरपणाचा काळ वगळतां, साधारण दर महिन्यास हे चक्र येते. पौगंडावस्थेपच्याष सुरुवातीस (मेनार्क) मासिक पाळी चालू होते आणि रजोनिवृत्तीच्याे वयात (मेनोपॉज) कायमची संपते.

मासिक पाळीच्या चक्राच्या पहिल्या दिवशी रक्त वाहण्यास सुरुवात होते, ज्या ला पहिला दिवस म्हिणतात. हे चक्र पुढील मासिक पाळीच्या जरा आधी थांबते. हे ऋतुस्त्रा व चक्र साधारणपणे 25 ते 36 दिवसांचे असते. फक्त 10 ते 15 टक्के स्त्रियांमध्ये मासिक पाळीचे हे चक्र अचूक 28 दिवसांचे असते. वयात आल्यानंतरच्या लगेचच्या काळात तसेच मेनोपॉजच्या वेळी हा फरक ठळकपणे दिसून येतो आणि दोन पाळ्यांमधील कालावधीदेखील अधिकतम असतो.
मासिक पाळीमधील रक्तस्त्राव 3 ते 7 दिवस चालतो व सरासरी 5 दिवस राहतो. ह्या काळाच्या2 दरम्यान सुमारे 0.5 ते 2.5 औंस रक्त जाते. एका सॅनिटरी नॅपकिनमध्ये – ज्याला टँपन असे ही म्हणतात – त्याच्या प्रकारानुसार 1 औंस रक्त शोषले जाऊ शकते. मासिक पाळीमध्ये वाहणारे रक्त नेहमीच्या जखमेतून येणार्यार रक्तापेक्षा वेगळे असते व स्त्राव भरपूर असल्यासशिवाय त्याची सहजपणे गांठ तयार (क्लॉटिंग) होत नाही.
मासिक पाळीच्या आवर्तनाचे नियमन संप्ररेकांमार्फत म्हणजेच हार्मोन्समार्फत केले जाते. ल्युटिनायझिंग आणि फॉलिकल-स्टिम्युलेटिंग प्रकारची ही संप्रेरके पिट्युटरी ग्रंथींमधून स्त्रवतात आणि ह्यांमुळे बीजांड निर्मितीच्या क्रियेस (ओव्ह्यूलेशन) चालना मिळते व बीजांडकोश (ओव्हरीज्) उत्तेजित होऊन इस्ट्रोजेन तसेच प्रोजेस्टेरॉनची निर्मिती होते. इस्ट्रोजेन तसेच प्रोजेस्टेरॉनमुळे गर्भाशय व स्तनांना उत्तेजना मिळून त्यांना भावी फलनास सज्ज केले जाते.

मासिक पाळीशी संबंधित विविध प्रकारच्या तक्रारी असू शकतात – अगदी छोट्या व किरकोळ समस्यांपासून दीर्घकाळच्या कटकटी आणि आजारपणापर्यंत. अशा विविध तक्रारींची माहिती येथे दिली आहे.

डिस्मेनोरिया-
मासिक पाळीच्या वेळी वेदना होणे हे 13 ते 18 वयोगटातील मुलींसाठी व तरुण महिलांसाठी सर्रास झाले आहे. जसे वय वाढत जाते, तशा वेदना कमी होत जातात. वेदना शमवणाऱ्या औषधांमुळे थोडा आराम मिळतो, पण मासिक पाळीच्या वेळी वेदना होण्याचे कारण काय, हे सांगणे कठीण आहे. साधारणपणे 30 ते 40 वयाच्या महिलांना गर्भाशय व ओटीपोटी यांच्या त्रासामुळे वेदना होतात.

बहुतेक स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी वेदना होतात, परंतु दहामधील एका स्त्रीला एवढ्या तीव्र वेदना होतात, की तिला तिची दैनंदिन कामे करणेही कठीण जाते- ज्यामुळे अशी मुली व स्त्रिया शाळेत किंवा ऑफिसला जाऊ शकत नाहीत. वैद्यकशास्त्रात मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या या वेदनांना डिसमेनहोरिया म्हणतात. "प्राथमिक स्वरूपाचा डिसमेनहोरिया' हा सर्वसाधारण प्रकारचा मासिक पाळीच्या वेळचा वेदनांचा प्रकार आहे. त्याच्या मुळाशी गर्भाशय व ओटीपोट यांच्या समस्या हे कारण नाही. हा प्रकार साधारणपणे विशीतील मुलींमध्ये दिसून येतो. "दुय्यम स्वरूपाचा डिसमेनहोरिया' हा प्रकार गर्भाशय व ओटीपोटाच्या समस्या असणाऱ्या स्त्रियांमध्ये दिसून येतो. हा प्रकार जास्त करून तिशी-चाळिशीच्या स्त्रियांमध्ये दिसून येतो.

मासिक पाळीदरम्यान पेटके किंवा क्रँप येण्याला डिस्मेनोरिया म्हणतात. ह्याचे प्रायमरी आणि सेकंडरी असे दोन प्रकार आहेत. प्रायमरी डिस्मेनोरिया म्हणजे मासिक पाळीच्या वेदना होणे.
मासिक पाळी चालू असलेल्या स्त्रियांमध्ये सर्वाधिक आढळणारी समस्या म्हणजे प्रायमरी डिस्मेनोरिया. ओटीपोटाशी संबंधित कोणताही आजार नसतानाही, पाळीच्या सुरुवातीलाच, ओटीपोटाच्या खालच्या भागात पेटके येतात. प्रायमरी व सेकंडरी डिस्मेनोरियामधील फरक आहे तो येथेच कारण सेकंडरी डिस्मेनोरिया एंडोमेट्रियोसिस सारख्या विकृतिचिकित्से मधून उत्पन्न होणार्याक वेदनामय मासिक पाळीशी संबंधित असतो.
ही समस्या सुमारे ९० टक्के स्त्रियांमध्ये आढळते. गंभीर स्वरूपाचा डिस्मेनोरिया चालूच राहिल्यास त्यातून अनेक धोके उत्पन्न होऊ शकतात, उदा. कमी वयापासून पाळी येणे, ती दीर्घकाळ चालणे, धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा. वजन कमी करण्याच्या प्रयत्नांचाही वेदनामय मासिक पाळीशी संबंध असतो मात्र शारीरिक हालचाली व व्यायामाचा नव्हे. मासिक पाळीच्या वेदना मूल झाल्यानंतर कमी होतात ह्या लोकप्रिय समजुतीस शास्त्रीय आधार नाही.
गर्भाशयाच्या अत्याधिक आकुंचनाने, अत्याधिक प्रोस्टॅग्लँडिन्स अथवा इतर काही आजारांमुळे सेकंडरी डिस्मेनोरिया होऊ शकतो.

लक्षणे :
पायाच्या वरील भागात, म्हणजेच मांड्यांमध्ये किंवा पाठीच्या खालील बाजूस, म्हणजेच कंबरेत दुखणे.
पाळीच्या आधी एक दिवस किंवा रक्तस्राव सुरू झाला, की वेदना सुरू होतात.
वेदना साधारण 12 ते 24 तास किंवा काही स्त्रियांना 2 ते 3 दिवस होतात.
प्रत्येक पाळीच्या स्वरूपात फरक असू शकतो. पण काही काही वेळा खूप त्रास व वेदना होतात.
बाळंतपणानंतर, तसेच वाढत्या वयानुसार वेदना कमी होत जातात.
तुम्हाला नेहमी ज्या प्रकारे वेदना होतात, त्याच्या स्वरूपातही बदल आढळतो. उदा.- मासिक पाळीच्या वेळी नेहमीपेक्षा खूप वेदना होणे वा नेहमीपेक्षा जास्त काळ दुखणे. काही महिला ज्यांना दुय्यम स्वरूपाच्या डिसमेनहोरियाचा त्रास असतो, त्यांना पाळी सुरू होण्यापूर्वी काही दिवस आधीच वेदना सुरू होतात व पाळी संपेपर्यंत सुरूच राहतात.

तुम्हाला यापेक्षा काही वेगळी लक्षणे दिसत असतील.
उदा.-
अनियमित रक्तस्राव.
दोन पाळींच्या मधल्या काळात रक्तस्राव होणे.
दोन पाळींच्या मधल्या काळात वेदना होणे.
आधीच्या पाळीपेक्षा पुढच्या वेळी जास्त रक्तस्राव होणे.
अंगावरून पांढरा स्राव जाणे.
शरीरसंबंधाच्या वेळी दुखणे.

अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास डॉक्‍टरांचा सल्ला घेणे आवश्‍यक आहे.

ऍमेनोरिया-

मासिक पाळी न येणे म्हणजे ऍमेनोरिया. ह्याचेही प्रायमरी आणि सेकंडरी असे दोन प्रकार आहेत. प्रायमरीमध्ये स्त्रीला अजिबात पाळीच येत नाही तर सेकंडरीमध्ये ती किमान ६ महिने येत नाही. गर्भारपण हे सेकंडरी ऍमेनोरियाचे मुख्य कारण असते.

मेनोरेजिया-

पाळीदरम्यान मोठ्या प्रमाणात किंवादीर्घकाळ रक्तस्त्राव होण्यास मेनोरेजिया म्हणतात. अर्थात जास्त रक्तस्त्रावाच्या परंतु सर्वसामान्य पाळीपेक्षा हा वेगळा असतो. ह्याचा संबंध सात दिवसांपेक्षाही जास्त काळ चालणार्या् अथवा अत्याधिक रक्तस्त्रावाशी आहे. ह्यामुळे रक्ताच्या मोठ्या गुठळ्याही दिसू शकतात. गर्भाशयीन तंतुयुक्त पदार्थ (युटेराइन फायब्रॉइड्स) अथवा संप्रेरकांच्या असंतुलनामुळे बरेचदा मेनोरेजिया होतो.

एंडोमेट्रियल कॅन्सर-

हा गर्भाशयाच्या अस्तराचा कर्करोग असतो. ह्यामध्ये योनीतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होतो. हा आजार गंभीर असला तरी आधीपासून लक्षात आल्यास त्यावर यशस्वीपणे उपचार करता येतात. हा साधारणतः इस्ट्रोजनचे प्रमाण जास्त असलेल्या किंवा ५० पेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांमध्ये दिसतो.

फायब्रॉइड्स-

गर्भाशयाच्या भिंतीच्या स्नायूमध्ये आढळणार्या वाढीस फायब्रॉइड म्हणतात. ही वाढ उर्फ गाठी लहान-मोठ्या असू शकतात. काही स्त्रियांमध्ये हे लक्षण मुळीच आढळत नाही तर काही स्त्रियांना ह्यामुळे जास्त रक्तस्त्रावाची दीर्घकालीन पाळी येते. ह्यामुळे ओटीपोटात किंवा संभोगाचे वेळी दुखू शकते, सारखे लघवीस जावेसे वाटते किंवा पोट जड वाटते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. जास्त मुले असलेल्या किंवा ३५ पेक्षाजास्त वयाच्या स्त्रियांना फायब्रॉइड्सचा धोका जास्त असतो.

ओटीपोटात जळजळणे उर्फ पेल्व्हिक इन्फ्लेमेटरी डिसीज-

पेल्व्हिक इन्फ्लेमेटरी डिसीज उर्फ PID हा स्त्रियांच्या पुनरुत्पादक अवयवांत आढळणारा एक जंतुसंसर्ग आहे. PID चे एक लक्षण म्हणजे योनीतील स्त्रावास घाण वास येणे. ह्याचप्रमाणे अनियमित पाळी किंवा संभोगाचे वेळी दुखणे हीदेखील लक्षणे आढळतात. लैंगिक आजारांशी संपर्क होणे हे PID चे सर्वदूर दिसणारे लक्षण आहे. हा गंभीर आजार असून त्याने फॅलोपिन टयूबला इजा होऊन भावी काळात गर्भ राहण्यास अटकाव होऊ शकतो.

पाळीपूर्वीची लक्षणे उर्फ प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम-

पुष्कळशा स्त्रियांमध्ये ही लक्षणे पाळीपूर्वीच्या सात ते चौदा दिवसांमध्ये दिसू शकतात आणि कधीकधी ती पाळी सुरू झाल्यानंतरही टिकून राहतात. मात्र काही स्त्रियांना ह्याचा भरपूर मानसिक तसेच शारीरिक त्रास होऊ शकतो.

पाळीपूर्वीच्या लक्षणांचे निदान करणे-

पाळीपूर्वीच्या लक्षणांचे निदान करण्यासाठी डॉक्टराना चाचण्याची एक मालिकाच योजावी लागते. ह्यामध्ये ओटीपोटाची, रक्ताची व अल्ट्रासाउंड तपासणी करतात. पाळीशी संबंधित एकदाच उद्भवलेल्या किंवा दीर्घकाळपर्यंत न उद्भवलेल्या समस्या ह्या चाचण्यांमधून कदाचित दिसून येतही नाहीत. नंतर केव्हातरी किंवा त्यांचे स्वरूप गंभीर झाल्यानंतरच त्या लक्षात येतात.

मासिक पाळीच्या समस्यांवर उपचार कसे करावे-

मासिक पाळीशी संबंधित समस्यांवरील इलाज व उपचार हे मुख्यतः त्या समस्येच्या स्वरूपावर व ती आढळण्याच्या कालावधीवर अवलंबून असतात. किरकोळ समस्यांवर किंवा सहा महिन्यांपेक्षा कमी काळपर्यंत दिसलेल्या समस्यांवर डॉक्टर साधारणपणे जीवनशैली बदलण्याचे किंवा स्वतःच करण्याजोगे उपाय सुचवतात, उदाहरणार्थ -

नियमित व्यायाम;

संतुलित आहार घेणे;-
आहारात जास्तीचे लोह, कॅल्शिअम आणि ब जीवनसत्वाचा समावेश करणे (अथवा पूरक औषधे किंवा गोळ्या घेणे);
मासिक पाळीच्या वेदनांसाठी पॅरासिटेमॉल घेणे;
गरम पाण्याची बाटली वापरणे

मासिक पाळीच्या समस्यांवर आपण वनौषधींचे व इतरही उपाय करू शकता, उदाहरणार्थ.
विशिष्ट पूरक वनौषधी घेणे
आल्याचा चहा पिणे
जंगली सुरणासारख्या पेटके-विरोधी भाज्या खाणे ;
ओटीपोटावर लव्हेंडर तेल चोळणे;
रास्पबेरीच्या पाल्याचा चहा पिणे;
जिंक्गो हे पूरक औषध घेणे
विशिष्ट पुष्पौषधी (फ्लॉवर रेमेडीज्) घेणे
मसाज करून घेणे
ऍक्युपंक्चर करून घेणे

मासिक पाळीचा जास्त व दीर्घकाळ त्रास होत असल्यास डॉक्टर खालील प्रकारची औषधे घेण्यास सांगू शकतात

सूज-विरोधी

संप्रेरके बदलणे (हार्मोन रिप्लेसमेंट)
नियमित पाळीसाठी तोंडावाटे घेण्याच्या गर्भनिरोधक गोळ्या
फायब्रॉइड्स किंवा कर्करोगासारखा एखादा गंभीर आजार दिसून आल्यास शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. ह्याप्रकारच्या बर्याआच समस्या किरकोळ असतात व फार काळजीचे कारण नसते. मासिक पाळीवर विविध घटकांचा परिणाम होत असतो आणि पाळीच्या सुरुवातीच्या काही समस्या शरीरास त्यांची सवय होईपर्यंतच टिकतात. अर्थात पाळीजास्त दिवस चालल्यास, अत्याधिक रक्तस्त्राव असल्यास अथाव रक्ताच्या गुठळ्या दिसल्यास डॉक्टरी सल्ला घेणे उत्तम.

तुम्हाला पाळीच्या वेळी वेदना होत असेल तर काही उपचार :
उष्णता : गरम पाण्याने अंघोळ करणे वा गरम पाण्याच्या बाटलीने ओटीपोटाकडे शेकणे. यामुळे वेदनांपासून आराम मिळण्यास मदत होते.

रसायनविरहित वेदनाशामक औषधे : रसायनविरहित वेदनाशामक औषधांमुळे वेदना कमी होण्यास मदत होते. ही औषधे डॉक्‍टरांच्या लेखी स्वरूपातील सूचनेशिवाय (prescription) मिळत नाहीत. वेदना निर्माण करणाऱ्या प्रोस्टॅग्लॅंडीन रसायनांना रोखण्याचे काम ही औषधे करतात. यामुळे रक्तस्राव कमी होण्यासही मदत होते.

पोषक आहार : पोषक आहारामुळे वेदनामुक्त पाळीचा त्रास कमी होऊ शकतो. दुग्धयुक्त पदार्थ, लाल मांस, व्हेजिटेबल ऑइल्स यांचे सेवन करावे. चरबीयुक्त पदार्थ खाऊ नयेत. खाताना अन्न व्यवस्थित चावून खावे, त्यामुळे गॅसेसचा त्रास होत नाही. फायबर्सयुक्त फळे, भाज्या, ओटमिल, राई, होल ग्रेन्स, लेंटिल्स, चिकपीज यांचे सेवन करावे.

योग : योग पद्धतीतील अर्ध शलभासन, पूर्ण शलभासन, वज्रासन, पश्‍चिमोत्तानासन, अर्धमत्स्येंद्रासन आणि त्रिलोकासन, या आसनांमुळे पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदनांपासून होणारा त्रास कमी होऊ शकतो. याबरोबर श्‍वासाचे व्यायाम, प्राणायाम यामुळेही वेदनांपासून आराम मिळू शकतो. नियमितपणे वा पाळी येण्यापूर्वी एक आठवडा ही आसने करण्याची सवय स्वत:ला लावून घ्या.

सर्व प्रकारच्या जीवनसत्त्वांनी युक्त औषधे : चांगल्या प्रकारची सर्व जीवनसत्त्वांनी युक्त औषधे व खनिज द्रव्ये घेतल्याने तुम्ही वेदनांचा त्रास कमी करू शकता. बी 6 हे जीवनसत्त्व चांगल्या प्रोस्टॅग्लॅंडिन्स तयार करते. त्यामुळे रक्तवाहिन्या रुंद होण्यास व आराम मिळण्यास मदत होते. बी 1 व बी 6 ही जीवनसत्त्वे पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळण्यासाठी उपयुक्त आहेत. पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदना संपविण्यासाठी खनिज द्रव्ये उपयुक्त ठरतात. कारण ती आवश्‍यक अशा फॅटी ऍसिड्‌सचे योग्य रूपांतर करण्यासाठी आवश्‍यक असतात.

मासिक पाळीचा स्त्राव अधिक होत असल्यास – साधारण वयाच्या दहाव्या वर्षापासून कधीही पाळी सुरू होते. काही वेळा रक्तस्त्राव अधिक असतो तर काही वळा तो अगदीच कमी असतो. स्त्राव साफ असणे हो आरोग्यासाठी महत्वाचे असते. जादा स्त्राव असेल तर कोहळा आणून किसावा. त्याचा पिळून रस काढावा व १ कप रस अधिक २ चमचे साखर असे दिवसातून दोन वेळा घ्यावे. आवश्यकतेनुसार वापरून उरलेला कोहळा रेफ्रिजिरेटरमध्ये न ठेवता ओल्या फडक्याखाली झाकून ठेवावा
लक्षात ठेवा, मासिक पाळी हा शाप नाही. निरोगी व आरोग्यपूर्ण जीवनासाठी रोजचा व्यायाम, व्यवस्थित झोप, आराम व उत्तम, सकस आहार यांचा समतोल असणे आवश्‍यक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या