जुनाट सर्दी अॅलर्जी वर आयुर्वेदिय उपचार
सर्दी १२ आठवडय़ांपेक्षा अधिक टिकत असेल तर त्याला जुनाट सर्दी किंवा ‘क्रॉनिक सर्दी’ म्हणतात. जवळपास ८० ते ९० टक्के रुग्णांमध्ये जुनाट सर्दी ही अॅलर्जीमुळे होत असल्याचे दिसून येते. काही व्यक्तींना विशिष्ट अशा आहार, वातावरण यांच्या संपर्काने अथवा सहवासाने वेगवेगळ्या प्रकारचा त्रास जाणवू लागतो. उदा. शिंका येणे, डोळे लाल होणे, डोळे खाजणे, नाक वाहने इत्यादी. तेव्हा आपण त्या व्यक्तीला विशिष्ट अशा आहार, वातावरण याची अॅलर्जी आहे, असे समजतो.
‘अॅलर्जी म्हणजे नक्की काय?’
अॅलर्जी याचा व्यवहारात अर्थ ‘सहन न होणे’ विश्वातील सजीव किंवा निर्जीव, दृश्य किंवा अदृश्य अशा कोणत्याही पदार्थाची उदा. थंडपाणी, थंड हवा, धूळीकण इत्यादीपासून ते विशिष्ट कपडे, गंध, प्रकाश अन्नपदार्थ पर्यंत कोणत्याही घटकाची अॅलर्जी असू शकते. म्हणजेच असे त्रास देणारे पदार्थ नाकाच्या किंवा घशाच्या संबंधात आल्यानंतर तेथील पेशींना ते सहन होत नाहीत व परिणामी त्या जागी उत्तेजना उत्पन्न होऊन शरीर असा पदार्थ नाकातून, घशातून बाहेर फेकून देण्याचा प्रयत्न करते म्हणजेच शिंका येतात किंवा ठसका लागतो,
आयुर्वेद दृष्टिकोनातून अॅलर्जी ही एक अवस्था आहे. ज्यामध्ये रुग्णांच्या शरीरातील वात-पित्त-कफ या त्रिदोषांची विकृत अवस्था प्रकोप आहे. जोपर्यंत ही अवस्था असेल तोपर्यंत रुग्णांना अॅलर्जी होईल. तसेच त्रिदोषांच्या विकृत अवस्थेला अनुकूल आहार सेवन व वातावरणाचा सहवास रुग्णांनी केला असेल तर अॅलर्जीची लक्षणे तीव्र स्वरुपात जाणवू लागतात.
जुनाट सर्दीची लक्षणे:-
खालील विविध स्वरुपाची लक्षणे घेऊन रुग्ण येतात.
• पहाटे किंवा रात्री शिंका येतात त्यानंतर नाक गळू लागते. त्यातूनच नंतर घसा धरतो.
• रोज रात्री नाक चोंदते किंवा बंद होते व श्वास घेण्यास त्रास होतो.
• कोणताही उग्र वास आला, जरासा वारा लागला की शिंका येऊन नाक गळू लागते.
• सर्दी झाली की नाक चोंदते, डोके जड होते, डोके व डोळे दुखतात, सकाळी व रात्री डोके जास्त दुखते.
• काही रुग्णांना सर्दी झाली की कान दुखू लागतात, बधीर होतात, चक्कर येते.
• लहान मुलात नाक गळू लागली की घसा दुखतो, टॉन्सीलना सूज येते, छाती घरघरू लागते, कफ साठतो हे वारंवार घडत असते.
• सर्दी झाली की लगेचच अर्धे डोके दुखते काहीजण यासच ‘अर्धशिशी’ म्हणतात.
आयुर्वेदिक औषधोपचार:-
आयुर्वेदाच्या मते शरीरातील वात, पित्त व कफ या तीन दोषांपैकी विशेषतः वात व कफ बिघडल्यामुळे हा आजार उत्पन्न होत असतो. औषधांच्या सहाय्याने बिघडलेले वात व कफ कमी करून, नाकाची प्रतिकार शक्ती वाढवून, विशिष्ट पथ्य काही काळपर्यंत संभाळले तर हा आजार पूर्णतः बरा होऊ शकतो, हे मात्र नक्की
आयुर्वेदिक पंचकर्म उपचार:-
शरीरामध्ये अत्याधिक प्रमाणात वाढलेले दोष बाहेर काढण्यासाठी पंचकर्म अतिशय उपयुक्त सिध्द होतात.
1) वमन पंचकर्म:- वाढलेला / बिघडलेला कफ़दोष उलटीव्दारे तोडांवाटे बाहेर काढण्याचा उपक्रम म्हणजे वमन पंचकर्म होय. जुनाट सर्दी, अलर्जी, खोकला, दमा व कफ़ाचे आजारांसाठी याचा उपयोग होतो.
2) नस्य पंचकर्म:- नाकाच्या आसपासच्या प्रदेशातील वाढलेला कफ काढून टाकण्यासाठी प्रथम नाक, कपाळ, चेहरा, डोके, यांना औषधी तेलाने विशिष्ट प्रकारे मालीश करून नंतर औषधी काढ्यांच्या वाफेने शेक देऊन योग्य असे औषधांचे काही थेंब नाकात सोडले जातात. सलग सात ते चौदा दिवस हा उपचार केल्यास बिघडलेला कफ निघून कमी होण्यास मदत मिळते. नाकातील सुज कमी होते, नाकातील त्वचेची प्रतिकार शक्ती वाढुन आजार बरा होण्यास मदत मिळते.
पथ्यपालन महत्त्वाचे -
आहारातील वात, कफ वाढविणारे असे दही, आंबट ताक, केळी, तळलेले पदार्थ, लोणची चिंच, पाणीपुरी, भेळ, आबंट फळे, कोल्ड्रींक्स, बीअर हे पदार्थ, तसेच वारंवार वेगवेगळ्या ठिकाणचे पाणी पिणे या गोष्टी पूर्णतः काही काळ वर्ज्य कराव्या लागतात. या रुग्णांनी थंड पाण्यात काम करणे, गार वार्यातून काळजी न घेता प्रवास करणे, धूळ उडवणारी अशी, झाडणे, लोटणे, पाखडणे, झटकणे ही कामे कधीही करू नयेत. तसेच धुराचा संपर्क प्रयत्न पूर्वक टाळावा.
त्यामुळे आयुर्वेदिय औषधोपचार, पंचकर्म उपचार व पथ्य पालन केल्यास य क्लिष्ट वाटणा-या अलर्जीपासुन सहज मुक्तता मिळु शकते. यासाठी आपण लवकरात लवकर आयुर्वेद अंगीकारणे गरजेचे आहे, हे मात्र नक्की.

0 टिप्पण्या