calendar

header ads

सोरायसिस बरा होऊ शकतो!!

सोरायसिस बरा होऊ शकतो!!
◾ त्वचेवर लाल चट्टे निर्माण होऊन त्या ठिकणी खाज सुटणं, त्वचेतून चंदेरी रंगाचे माशांच्या खवल्यांप्रमाणे खवले पडणं ही ‘सोरायसिस’ या त्वचाविकारातील प्रमुख महत्त्वाची लक्षणं. या विकाराची सुरुवात डोक्याच्या टाळूपासून झाल्यास ‘कोंडा’ झालाय, असं समजून या त्वचाविकाराकडे दुर्लक्ष करूनये. या रोगाची सुरुवात ही प्रामुख्याने डोक्याच्या टाळूवरून, कानांमागून, कोपरं आणि ढोपरांच्या त्वचेवरून होते. हा रोग संसर्गजन्य नसला तरी वेळीच योग्य ते उपचार करूनघेणं गरजेचं असतं. रोगप्रतिकारशक्तीत बिघाड झाल्यामुळे ‘सोरायसिस’ हा त्वचाविकार डोकं वर काढतो. या आजारात त्वचेच्या एका भागावर जास्त त्वचेचे थर निर्माण होतात. त्यामुळे त्वचा जाडसर होते. या आजाराचा उपचार आयुर्वेदात आहे का, तर नक्कीच आहे.
◾आयुर्वेदात त्वचाविकारांना ‘कुष्ठ’ असं म्हणतात. मानसिक चिंतांमुळे हा रोग वाढतो, असंही संशोधनातून लक्षात आलं आहे.
◾गुडघे आणि कोपराच्या सांध्यावर वारंवार घर्षण होत असल्याने तिथे बऱ्याचदा सोरायसिसची चक्रंदळं (गोलकार चकत्या, चट्टे) निर्माण झालेल्या पाहण्यास मिळतात. सफेद कांद्याची अगदी बाहेरची साल असावी तसा चंदेरी रंगाचा चामडीचा थर तयार होतो. सोरायसिसच्या जखमांमधून जर रक्त जास्त वाहत असेल तर सोरायसिसचे चट्टे लाल रंगचे दिसतात. नाहीतर चट्टयांचा रंग काळ्या किंवा करड्या रंगाचा असतो, असे चट्टे शरीराच्या ज्या भागावर असतात तिथे घाम येत नाही. हाता-पायांच्या तळव्यांवर हा रोग झाल्यास तिथली त्वचा कडक होऊन फाटते. या विकारात त्वचेवर येणा-या चट्टय़ांना निश्चित आकार नसतो. कधी कधी आकार लहान-मोठा असतो.
◾खाण्याचे कोणते प्रकार टाळावेत? आहारात जास्त खारट (लोणचं, पापड, चिवडा, वेफर्स, फरसाण, खारेदाणे, खारवलेला सुकामेवा इ.), आंबट चिंच, टॉमेटो, लिंबू, आमचूर, कैरी, दही, आंबट पेय, आंबवलेले पदार्थ , अतिशय गोड चवीचे पदार्थ असणं. खाण्याचा सोडा किंवा इतर क्षार. शिळे पदार्थ खाणं. चहात बिस्किटं किंवा पोळी-चपाती बुडवून खाणं. दूध आणि फळं एकत्र करूनकेलेले पदार्थ. दूध आणि माशांचे पदार्थ एकाच वेळी खाणं. शरद रूतूत विरेचन घेऊन शरीर स्वच्छ केले पाहिजे. असं न केल्यास काही व्यक्तींना मंडलकुष्ठासारखा सोरायसिसचा एक विकार जडू शकतो.
◾आयुर्वेदीक पंचकर्म उपचाराने सोरायसिस हा आजार पूर्णतः कायमचा दूर होऊ शकतो

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या