calendar

header ads

सोरायसिस

सोरायसिस
      सोरायसिस हा त्वचारोग आहे. शरीराच्या कुठल्याही भागाला हा रोग होऊ शकतो, परंतु कोपरा,गुडघा, डोके आणी पाठीचा खालचा भाग इथे होण्याची शक्यता जास्त असते. 
           याचे काही प्रकार आहेत. परंतु चट्यांचा सोरायसिस 95% आढळून येतो. यात त्वचेवर लालसर चकतीप्रमाणे धामे येतात. त्याची कड बाजुच्या त्वचेपेक्षा वेगळी दिसु लागते. चकतीचा मागील भाग खरखरीत लागतो आणि खवल्यांसारखा दिसतो. रोगी सतत अस्वस्थ राहतो. हा रोग संसर्गजन्य मात्र नाही. 
             आपल्या मानसिक स्थितीचा देखील यावर परीणाम होत असतो, तणाव दुर झाल्यावर सोरायसिस फार लवकर बरा होतो, असा अनुभव आहे.   
               सोरायसिसवरील उपचाराचा महत्वाचा भाग म्हणजे रोगाचा स्विकार करणे. हा रोग आपलियाला झाला आहे, किंवा मला त्याच्यासोबत राहायचे आहे, असे जर आपल्या मनाने स्वीकारले तर उपचाराची अर्धी लढाई जिंकली, असे म्हणावे लागेल. त्यामुळे हा रोग झाल्यास इतरांपासून दूर राहणे, आत्मविश्वास कमी होणे,उदासपणा वाढणे इ.गोष्टी प्रयत्नपूर्वक टाळायला हव्यात. सोरायसिससाठी त्वचेवरचा बाह्य उपचार आणि पोटात घ्यायची औषधे असा उपचार सांगीतला जातो. सुर्यप्रकाशातील अतिनील किरणांमुळे सोरायसिसवर फायदा होतो असेही आढळून आले आहे.       
              सोरायसिसवर उपचार घेणे आणि तो आटोक्यात ठेवणे हेच आपल्या हातात आहे, ते प्रामाणिकपणे व सातत्याने केले पाहीजे.                   
              सोरायसिसमुळे वैवाहिक सबंधात काही फरक पडत नाही, त्यामुळे इतर त्वचारोगाप्रमाणे एकदम घाबरुन न जाता, थोडा कष्टसाध्य असलेल्या या रोगावर निश्चित नियंत्रण आणून तो नाहीसा करू शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या