१० जानेवारी १६६४ , रविवार (सुरतेवरील प्रथम स्वारी) शिवाजी महाराजांचे सुरतेहून प्रस्थान. महाबत खान सुरतेच्या रक्षणासाठी येत असल्याची खबर. १० जानेवारी १७६० दत्ताजी शिंदे बुर्हाडी घाटाच्या लढाईत पडले. दताजी शिंदे खरच खुप महान लढवय्ये होते मरणाचा दारात आपल्या जीवाची भिक न मागता “बचेँगे तो और लढेँगे” हा त्यांचा मराठी बाणा वाखाण्याजोगा आहे आजही आपल्या समाजात एखादया गोष्टीत हतबल झालेला किंवा पराभव पत्कारावा लागलेला हेच गौरवदगार म्हणतो “बचेँगे तो और लढेँगे” धन्य ते दताजी शिँदे
११ जानेवारी १६८० खांदेरी दुर्ग बांधून झाला… रायगड जिल्ह्यातील किल्ला आहे. भौगोलिक स्थान खांदेरीचा दुर्ग हा काही फार प्रसिद्ध दुर्ग नव्हे; पण हे बेट मुंबईच्या समोरच असल्याने अतिशय मोक्याचे आहे. इ.स.१६७९ च्या ऑगस्ट महिन्यात शिवाजीमहाराजांनी मायनाक भंडार्याला येथे पाठवून बेटावर किल्ला बांधावयास काढला. या बेटावर वेताळाचे एक मोठे राऊळ आहे. त्याची पूजा केल्याशिवाय कोणीही कोळी मासेमारीसाठी नावा समुद्रात घालत नाहीत. बेटावर एक टेकडी आहे आणि बेटालाच तटबंदी घातली आहे. इतिहास मायनाक भंडारी तटबंदी बांधत असताना ईस्ट इंडिया कंपनीच्या मुंबईतील वखारकरांती थांबवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. कॅप्टन विलियम मिंचिन, रिचर्ड केग्वीन, जॉन ब्रँडबरी, फ्रान्सिस थॉर्प या नाविक अधिकार्यांना खांदेरीवर पाठवून ते बेट मराठ्यांकडून काबीज करण्याचे मोठे प्रयत्न इंग्रजांनी केले. रिव्हेंज आणि हंटर नावाच्या दोन फ्रीगेटी त्यांनी पाठवल्या होत्या. गेप आडनावाच्या माणसाकडून काही गुराबा भाड्याने घेऊन त्यावर काही तोफा कशातरी बांधून त्यांनी इंग्रजी आरमार पाठवण्याचा प्रयत्न केला. मायनाक भंडार्याच्या मदतीला नंतर दौलतखानाचा आरमारी ताफा आला. आलिबाग- थळच्या किनार्यालगत असलेल्या या आरमाराने इंग्रजी आरमारातल्या त्रुटी हेरल्या. मराठ्यांच्या होड्या थळच्या किनार्यावरून सामानसुमान घेऊन खांदेरी बेटावर निघत. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी किनारा आणि बेट यांमध्ये नाविक मोर्चेबंदी उभारण्याचे इंग्रजांनी ठरवले होते; पण त्यांच्या मोठ्या जहाजांना या खाडीमध्ये ठिय्या देऊन राहण्याचे काम जमले नाही. वार्यामुळे त्यांच्या होड्या किनार्याकडे फेकल्या जात आणि त्या दगडांवर आपटून फुटण्याची भीती असल्याने इंग्रजांना ती जहाजे खोल पाण्यात न्यावी लागली. छोट्या गुराबा त्यांनी आणल्या असता डव्ह नावाच्या त्यांच्या गुराबेवर पाठीमागे तोफ नसल्याने ती त्रुटी हेरून मराठा आरमाराने पाठीमागून चक्राकार हल्ला चढवून ती गुराब पकडली आणि त्यावरच्या इंग्रजांना कैद करून सागरगडावर डांबले. या घटनेद्वारे सागराची भरती-ओहोटी, खोल- उथळ पाणी, मतलय वारे, इत्यादींचे स्थानिक ज्ञान मराठ्यांना इंग्रजांपेक्षा अधिक असल्याचे दिसले. संगमेश्वरी नावाच्या वेगळ्या आराखड्याच्या मराठा होड्यांनी या युद्धात कमाल केली. मराठे रातोरात या चिंचोळ्या होड्या वल्हवत बेटावर सामान पोहचते करीत. इंग्रजी जहाजे पूर्णपणे वार्यावर अवलंबून असत. खास मराठा बनावटीच्या या होड्यांनी इंग्रज आरमाराला आश्चर्यकारकरित्या चकवले.
१३ जानेवारी छत्रपति शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक नरवीर जीवाजी महाले (संकपाळ) यांचा पुण्यदिन आहे…. जीवाजी महाले हे अफज़ल खानला जेंव्हा राजे भेटीला गेले तेंव्हा त्यांच्यासोबत जे दोन अंगरक्षक होते त्यातील एक म्हणजे जीवाजी महाले आणि दुसरे संभाजी कावजी… जेंव्हा अफज़ल चा कोथला शिवरायांनी बाहर काढला तेंव्हा खानाचा अंगरक्षक सयाद्द बंडा हा राजांच्या अंगावर राजे बेसावध असताना धावून आला तेंव्हा त्या सयाद्द बंडाला धरतीवर कायमचा झोपविनारा वीर म्हणजे जीवाजी महाले… अरे म्हणतात ना होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी………. तर अश्या नरवीर जीवाजी महाले यांच्या पुण्यदिनांनिमित्य विन्रंम आभिवादंन… !
१४ जानेवारी १६५८ कोकण मोहिम आटोपून शिवाजी राजे राजगडावर आले. हाच तो दिवस ज्या दिवशी शिवाजी राजांनी आपल्या नव्या राजधानीवरील वास्तूत गृहप्रवेश केला. याच दिवशी शिवाजी राजे राजगडावर प्रथम राहावयास आले. काय वाटले असेल राजगडाला ? कृतज्ञता ! गहीवर !! जन्माला आल्याचे सार्थक !!! राष्ट्रपुरूषाची पायधूळ लागून राजगड तीर्थक्षेत्रात पालटून गेला, तो हा दिवस. यापूर्वी शिवरायांची राजधानी होती – किल्ले पुरंदर.
१४ जानेवारी १७६१ पौष शु. अष्टमी. बुधवार , पानिपतचा भयंकर , प्राणघातकी संग्राम गोविंद्रग्रजांच्या शब्दात सांगायचे तर, “कौरव पांडव संगर तांडव द्वापरकाली होय अती, तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती !!” पानिपत येथील पराभव हा मराठी राज्याला कलंक नसून अभिमानास्पद असाच आहे. कारण, या नंतर वायव्य सीमा कायमची सुरक्षित झाली. अफगाणी आक्रमक परत दिल्ली पाहू शकले नाहीत… करेंगे या मरेंगे… ह्या घोषणेपेक्षा.. ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ ही दत्ताजी शिंदे यांची बोली खुद्द महाराजांकडून आली होती. हा स्वराज्याचा मूलमंत्र होता…
१५ जानेवारी १६५६. छापा घालून जावळी काबीच. हणमंतराव मोरे ठार. मग्रूर चंद्रराव मोरे जावळीतून रायरी उर्फ रायगडावर फरार. शिवरायांना जावळीच्या स्वारीतून मोर्यांच्या तुर्यातले एक अमूल्य रत्न मिळाले. या रत्नाचे नाव होते – मुरारबाजी देशपांडे.
१५ जानेवारी १९१९ राजर्षी शाहू महाराजांनी आदेश काढून स्पृश्य-अस्पृश्य विद्यार्थ्याँना एकाच शाळेत शिक्षण देण्याची व्यवस्था सुरु केली.
१६ जानेवारी १६६६ , पहाटे ३ वाजता… शिवाजी महाराजांचा पन्हाळगडावर पराभव. १००० मावळे ठार. शिवाजी महाराजांचे विशाळगडाकडे पलायन. या घटनेने हिंदुपतपातशाहीतील समिकरणे बदलली. नेतोजी पालकर शिवाजी महाराजांना वेळेवर कुमक करू शकले नाहीत, म्हणून नेतोजी पालकरांना शिवरायांनी बडतर्फ केले. कुडतोजी गुजरांना ‘प्रतापराव’ ही पदवी देऊन सरनौबती दिली.
१६ जानेवारी १६८१ संभाजी महाराज छत्रपती झाले. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे सरसेनापती “हंबीरराव मोहिते” यांनी अण्णाजीपंत आणि मोरोपंत यांना अटक केली. शिवरायांचे जेष्ठ पुत्र संभाजी महाराज यांना स्वराज्याचे दुसरे छत्रपती होण्यासाठी राज्याभिषेक करण्यात आला.
१८ जानेवारी १६७५ शिवाजी महाराजांनी मुरुड-जंजिरा समोर कांसा उर्फ़ पद्मदुर्ग उभा करून सिद्दीला थेट आवाहन दिले होते. त्या जलदुर्गाचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणुन प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याला आरमारास रसद पोचवायचे काम दिले होते. या कामात हयगय केल्याबद्दल शिवरायांनी जिवाजी विनायक याला कडक शब्दात ताकिद देणारे पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात,”ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो?” पुढे राजे म्हणतात,”या उपरी बोभाट आलिया उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही, गनिमाचे चाकर गनीम जालेस ऐसे जाणून बरा नतिजा तुम्हाला पावेल. ताकीद असे.”
१९ जाने १६८२ संभाजीराजांनी मोहीम हाती घेतल्यापासून तोफांची तुफान सरबत्ती करून देखील जंजि-याच्या घेऱ्यात मराठ्यांना प्रवेश मिळत नव्हता. या संबधी मुंबईकरांनी सुरातकरांना १९ जाने १६८२ रोजी पत्र पाठवलेले उपलब्ध आहे त्या मधील नोंदीनुसार – ‘सिद्दी जोपर्यंत तह करत नाही किंवा माघार घेत नाही तो पर्यंत संभाजीस शांतता मिळणार नाही असा त्याने निग्रह केला आहे’. काही केल्या किल्ल्यात प्रवेश करणे जरुरीचे होते, किल्ल्याच्या आत प्रवेश केल्याशिवाय विजयश्री प्राप्त होऊ शकत नव्हती, जंजि-या भोवती सिद्दिचे आरमार आणि किल्ल्यातून होणारा प्रतिकार यामुळे काही प्रवेश करणे शक्य नव्हते, म्हणून संभाजी राजांनी आता सिद्दीस जेरीस आणण्यासाठी सागरात सेतू बांधण्याचा निर्णय केला. हे म्हणजे कल्पनेपलीकडचे होते इतिहासामधूनच इतिहास पाहायचा म्हटले तर जसे प्रभू रामचंद्रांनी वानर सेनेच्या मदतीने सेतू बांधून लंका प्रवेश केला तसेच थेट खाडी बुजवून सेतू बांधून जंजिरा सर करण्याचा संभाजीराजांचा मानस होता. सेतू बांधण्याचे काम सुरु झाले. लाकडाचे ओंडके, आवश्यक तेवढी साधन सामग्री मागवण्यात आली. हा प्रयोग कितपत यशस्वी होईल हा एक मोठा प्रश्नच होता, पण या कडे एक धाडसी निर्णय म्हणून पाहता येईल. सेतू बांधण्यात थोडे यश प्राप्त झाले खरे पण निसर्गचक्रापुढे कोणाचे काय चालणार? सागरास भारती आली आणि केल्या कामावर पाणी फेरले गेले. आणि याच दरम्यान औरंगजेब दख्खनेत उतरल्यामुळे आणि त्याचे सरदार कोकणात उतरल्यामुळे संभाजीराजांना जंजिरा मोहीम अर्धवट सोडणे क्रमप्राप्त झाले.
२० जानेवारी १६७४ दिलेरखानाने कोकणात उतरण्याचा प्रयत्न केला. पण मराठ्यांनी तो उधळून लावला. हा प्रकार नेमका कुठल्या घाटात घडला ? काही माहिती उपलब्ध नाही. या लढाईत दिलेर खानाचे १००० लोक ठार झाले. सुमारे ४०० ते ५०० मराठेही या लढाईत ठार झाले.
२० जानेवारी १६६३ औरंगजेब बादशहाचा वकील शेख मुहम्मद गोव्यात दाखल झाला. मुघलांच्या स्वराज्यावरील संभाव्य आक्रमणात पोर्तुगीजांनी सामील व्हावे आणि जाणाऱ्या रसदेला उपद्रव देऊ नये या अटी फिरांग्यांपुढे मांडल्या. एकीकडे बलाढ्य औरंगजेब बादशहा आणि दुसरीकडे पराक्रमी छत्रपती शंभूराजे अशा कात्रीत सापडलेल्या पोर्तुगीज व्हाइसरॉयने बादशहाच्या अटी मान्य केल्या. आणि वरकरणी मात्र राजांशी मैत्रीचे नाटक सुरु ठेवले.कल्याणजवळ पारसिक इथे किल्ला बांधण्याची तयारी संभाजीराजांनी सुरु केली असताना पोर्तुगीजांनी तिथे किल्ला बांधून पूर्ण केला.इतकेच नव्हे तर फिरंग्यांच्या प्रांतातून मोघालाना दिवसाढवळ्या रसद. पोहोचू लागली. फिरंग्यांचा हा दुटप्पीपणा लक्षात येताच त्यांनी उतार कोकण या त्यांच्या मुलखातील गावे बेचिराख केली. मराठे आणि पोर्तुगीज यांच्या संघर्षाची ठिणगी पडली,सन १६८९ मध्ये पोर्तुगीज गव्हर्नर म्हणून अल्व्हारो याची नेमणूक झाली होती
२१ जानेवारी १६६२ आदिलशहाच्या ताब्यातील कोकणपट्टी स्वराज्यातसामील करण्याच्या दृष्टीने शिवाजी महाराजांनी कोकण स्वारीस प्रारंभ केला
२३ जानेवारी १६६४ (शालिवाहन शके १५८५ , माघ शु.५) ज्यांच्या मनात पेटली स्वातंत्र्याची ठिणगी, ज्यांच्या विचारातून घडले स्वराज्य, शिवबा आणि संभाजी त्याच फर्जंद शहाजी राजे भोसले म्हणजेच थोरले महाराजसाहेब यांचे कर्नाटकात होदेगीरीच्या जंगलात शिकार करताना अपघाती निधन झाले. शहाजीराजे भोसले हे पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्यांचे बीजारोपण शिवाजीराजांमध्ये करणारे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होते.जेव्हा दिल्लीमध्ये दिल्लीपती शहेनशाह शहाजान आणि महंमद आदिलशहा या दोघांनी मिळून निजामशाही संपवली, त्या वेळी निजामशहाचा वारसदार मूर्तझा या लहान मुलाला स्वत:च्या मांडीवर बसवून शहाजीराजांनी स्वतंत्रपणे राज्यकारभार सुरू केला, व जणू स्वत:वरच छत्र धारण केले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ ३ वर्षे टिकला होता. राजस्थानच्या चित्तोडगढच्या संग्रामात अल्लाउद्दीन खिलजीशी लढताना राणा लक्ष्मणसिंह नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला पुढे ‘भोसले’ हे नाव प्राप्त झाले. याच वंशात पुढे वेरुळस्थित बाबाजीराजे भोसले यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. पुढे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा इ.स. १६०३ मध्ये विवाह झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचच मालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसेजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली. दरम्यान अहमदनगरजवळील भातवडीच्या रणांगणात निजामशाही संपवण्यासाठी भारतवर्षातील सर्व इतर सत्ता एकत्र आल्या होत्या. निजामशाही वाचवण्यासाठी या एकत्रित फौजांचा सामना शहाजीराजे वजीर मलिक अंबरच्या साथीने करीत होते (इ.स. १६२४). त्यांना त्यात यश मिळाले. शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला. याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. पण पुढे मलिक अंबरची दरबारातील राजकारणी वागणूक पाहून शहाजीराजे आदिलशाहीत गेले. त्यानंतर इ.स. १६३९ मध्ये आदिलशहाकडून “सरलष्कर” ही पदवी त्यांना देण्यात आली व बंगळूरची जहागिरीही त्यांना प्राप्त झाली. आदिलशाहीत असताना शहाजीराजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता. शहाजीराजांना बंगळूरचा प्रदेश फार आवडला. शहाजीराजे व त्यांचे थोरले चिरंजीव संभाजीराजे यांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे या ठिकाणी ठरविले. ते मुळातच उत्तम प्रशासक व पराक्रमी योद्धे होते. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणूनच त्यांनी योग्य वेळ पाहून पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवले होते. त्याचबरोबर श्यामराज रांझेकर, बाळकृष्णपंत हणमंते, रघुनाथ बल्लाळ अत्रे, कान्होजी जेधे नाईक व यांच्याबरोबर इतर अनेक मातब्बरांना जय्यत तयारीनिशी शिवाजी महाराजांसोबत राज्यकारभारासाठी पाठवले होते. राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही शहाजीराजांनीच शिवरायांना दिली. दरम्यानच्या काळात आदिलशहाचा मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, बाजी पवार, बाळाजी हैबतराव, फतहखान, आझमखान यांच्या साहाय्याने शहाजीराजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले. साखळदंडांनी बांधून भर विजापुरातून शहाजीराजांना दरबारात हजर करण्यात आले. तो दिवस होता
२५ जुलै, इ.स. १६४८ चा. हे कळताच शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवले. स्वत: आपण व आपले पिता शहाजीराजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात असे त्यांनी लिहिले. या बदल्यात शहाजीराजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी ही अट घातली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावले होते. हा प्रयत्न यशस्वी ठरला. शहाजीराजांची दि. १६ मे, इ.स. १६४९ रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली.शहाजीराजांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की त्यांनी स्वाभिमान राखत आदिलशाही,मुघलशाही व निजामशाही – या सर्व सत्ताधीशांकडे काम केले. त्यांच्या कारकीर्दीचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे, इ.स. १६२५ ते इ.स. १६२८ – आदिलशाही इ.स. १६२८ ते इ.स. १६२९ – निजामशाही इ.स. १६३० ते इ.स. १६३३ – मुघलशाही इ.स. १६३३ ते इ.स. १६३६ – निजामशाही इ.स. १६३६ ते इ.स. १६६४ – आदिलशाही पुढे इ.स. १६६१-इ.स. १६६२ दरम्यान शहाजीराजे महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यानंतरचा काही काळ शिवाजीराजे व जिजाबाईंसमवेत घालवला. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. माघ शुद्ध ५, म्हणजेच
२३ जानेवारी,इ.स. १६६४ रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला व ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एक शूर मराठा सरदार. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीराजांचे पिता व राजमाता जिजाबाई यांचे यजमान.
२५ जानेवारी १६६५ शिवाजी महाराजांचे राजनैतिक सल्लागार व विश्वासू सेवक सोनोपंत तथा सोनोजी विश्वनाथ डबीर यांचे निधन. सोनोपंत डबीर म्हणजे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळीतील एक मौल्यवान रत्न. मराठा साम्राज्याचे पेशवे (पंतप्रधान) श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब व सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला केली होती. सोनोपंत डबीर यांचे छत्रपति शिवाजी महाराज यांना सुनावलेले खड़े बोल – जेव्हा शाहजी राजे आदिलशाहकड़े बंदी होते त्यांच्या सुटकेसाठी आदिलशाहने सिंहगड किल्ला परत मागितला होता तेव्हा छत्रपति शिवाजी राजे आपल्या पित्यावर रुष्ट झाले होते अणि तेव्हा सोनोपंत डबीर यांनी त्यांचा रुसवा काढताना “पराक्रमी राजलाच पृथ्वी वश होते , राजे एक सिंहगड गेला म्हणुन तुम्ही पित्यावर रागावता, त्यापेक्षा एक गडाच्या बदल्यात आदिलशाहने शाहजी राजंसारख्या सिंहाला मुक्त केले आहे राजे… आता तुम्ही पृथ्वीवर राज्य करा”
२६ जानेवारी १६७१ महाराजांना वेळो वेळी मोहिमेवर जावे लागे , अशा वेळी आईसाहेब सर्व राज्यकारभार पाहात असे , माञ अता आईसाहेब वुद्ध झालात . आईसाहेब राज्यकारभार योग्य रितीनी सांभाळात असे म्हणून अता त्याच्या मदतीस आजच्या ता . २६ जाने १६७१ रोजी संभाजीराजांची निवड महाराजांनी केली.
२६ जानेवारी १६७४ अकबर २६ जाने १६७४ रोजी तो आसदखाना बरोबर काबुलच्या स्वारीवर गेला . शिवाजी महाराजांनी २६ जानेवारी रोजी ला पहाटे उंदेरीच्या आरमार जवळ आले .
२६ जानेवारी १६६२ शास्ताखान सोबत आलेल्या मोगली फौजेचे पवनमावळातील लोहगड, विसापूर, तिकोना या परिसरात चढाया २६ जाने १६४५ गुरूवार रांझ्याच्या पाटलाची गोष्ट ही सर्वश्रुत आहे. रांझे गावचा पाटील बाबाजी गुजर याने गावकीतल्याच एका गरीब शेतकर्याच्या तरूण मुलीला दिवसाढवळय़ा सर्वासमक्ष पळवून तिच्यावर बलात्कार केला, अब्रुच्या भीतीने तीने जीव दिला! सारा गांव हळहळता पण मुकाच राहिला!.. पण शिवरायांच्या काही ही गोष्ट आली. ते सालं होतं १६४५ आणि शिवरायाचं वय होत केवळ पंधरा वर्षे परंतु या वयातही शिवरायांनी मुजोर बाबाजी गुजरला पकडून आणले. खटला चालवून बाबाजी गुजर या पाटलांचा चौरंग केला. चौरंग करणे एक हात पाय कलम करणे, विचार करा ही शिक्षा जर आजच्या काळात अमंलात आणली तर काय होईल! परंतु याच शिक्षेमुळे सार्या मावळ खोर्यावर एक प्रकारची दहशत बसली. रयत लहानग्या शिवरायांवर अक्षरश: खुश झाली. स्त्रियांच्या अब्रु रक्षणाबाबत जर शिवराय असे धोरण अवलंबत असेल तर त्यांच शिवबांसाठी रयत काहीही करायला तयार झाली. शिवरायांचे वय १५ वर्षांचे पण त्यांच्या याच न्याय स्वभावामुळे अनेक मराठे त्यांच्या फौजेत नुसते सामीलच झाले नाही तर मरायला सिद्ध झाले. कारण ज्यांच्या पाठबळावर राजांनी राज्य करायचं त्या वतनदार, पाटील, देशमुख आदी मंडळीची सुद्धा गय न करता त्यांना शिक्षा करायची धमक शिवरायांच्या ठायी होती. याच दिवशी रांझ्याच्या पाटलाला शिक्षा दिली गेली आणि इथूनच एका क्रांतीची सुरूवात झाली..
२८ जानेवारी १६४५ शिवरायांनी रांझ्याचा पाटिल – बाबाजी भिकाजी गुजर याचे, त्याने बद-अमल केला म्हणून दोनही हात व दोनही पाय कापून काढले व त्याची पिढीजात पाटिलकी जप्त केली. २८ जानेवारी १६४६ शिवाजीराजांचे ‘मराठी राज्याची राजमुद्रा’ वापरून लिहिलेले पहिले उपलब्ध पत्र. रांझ्याच्या पाटलाचे तोडले हातपाय २८ जानेवारी १८५१ दुसरे बाजीराव पेशवे यांचे कानपूर जवळ बिठूर उर्फ ब्रम्हावर्त येथे निधन २८ जानेवारी १६८१ शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा टाकला हे आपल्याला माहित आहे , दोनदा टाकला हेही आपल्याला माहित आहे. त्याच प्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या बाहेर जावून मध्य प्रदेशातल्या बुऱ्हाणपूर वर छापा टाकला . उत्तरेकडील आग्रा आणि दिल्ली हि शहरे म्हणजे मोगलांची सर्वात मोठी वैभवनगरे. पण यानंतर बुऱ्हानपूर हि मोगलांची एक मोठी वैभवनगरी होती. तिची दुसरी ओळख म्हणजे “दक्षिणेचे प्रवेशद्वार”. भारतातली एक मोठी बाजारपेठ होती. राज्याभिषेक १६ जानेवारी १६८१ ला झाला आणि लगेच १४ व्या दिवशी छापा टाकला. रायगड ते बुऱ्हाणपूर हे १०००किमी पेक्षा जास्त अंतर आहे . परंतु फक्त ४ ते ५ दिवसा मध्ये संभाजी महाराज बुऱ्हाणपूर ला पोहोचले. आणि १ करोड होनांची दौलत स्वराज्यात आणली .
३० जानेवारी १६८१ संभाजी महाराज यांनी बुऱ्हाणपूर शहराच्या तटबंदीबाहेरील बहादूरपुरा व इतर सतरा पूरे लुटून अलोट संपत्ती मिळविली. त्यावेळी बुऱ्हाणपूरचा सुभेदार खानजमान याने मराठ्यांना प्रतिकार न करताच बुऱ्हाणपूरचे दरवाजे बंद करून घेतले
0 टिप्पण्या