calendar

header ads

◾पोटाचे आजार ,पचनाच्या समस्या

◾पोटाचे आजार ,पचनाच्या समस्या

 -सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे व बैठे काम,सतत गाडीचा वापर,व्यायामाचा अभाव ,पायी चालणे नसल्यामुळे  ,चुकीचे खाणे पीणे यामुळे अपचनाच्या अनेक  समस्या वाढत आहेत. 
◾आजाराची कारणे –
१) वेळी-अवेळी चुकीचे जेवणे,
२) जेवणानंतर पुन्हा जेवणे,
३) भूक नसताना जेवणे,
४) भुकेचे वेळी पाणी पिणे,
५) पचावयास जड, थंड, तेलकट, तूपकट, मसालेदार व खूप तिखट पदार्थ खाणे,
६) तहान असताना पाणी न पिणे,
७) अत्यंबुपान
८) चहा, कॉफी, पान, तंबाखू, विडी, सिगारेट, तपकीर यांचा वापर,
९) चुकीची औषधे

*लक्षणे –*
१. मलप्रवृत्तीस वेळ लागणे, जोर करावा लागणे, जोर करूनही पुरेशी मलप्रवृत्ती न होणे
३. मलाचे स्वरूप चिकट,आवयुक्त किंवा खडा असणे
४. मलामध्ये जंत-कृमी असणे.
५. काही खाऊ नये अशी इच्छा होणे, कमी भूक लागणे.
६. शौचासला आग होणे,मुळव्याधीची लक्षणे उत्पन्न होणे, रक्त पडणे
७. पोट फुगणे, पोट डब्ब होणे, पोटाच्या खालच्या भागात वायू धरणे, अजीर्ण होणे.
८. चक्कर येणे, डोळे दुखणे, त्वचा निस्तेज होणे, अंगाला खाज सुटणे, डोळे व लघवी पिवळी होणे.

*पथ्यापथ्य –*

* वेळेवर व थोडी भूक ठेवून जेवावे. आग्रहापोटी जास्त जेवू नये,रात्री उशीरा जेवू नये.
* जेवणात तेलकट, तुपकट, जड, खूप थंड, खूप तिखट, मसालेदार पदार्थ, शिळे अन्न असू नये.
* कठीण मल असणार्‍यांनी तूप व तेलाचे आहारातील प्रमाण वाढवावे
*कोमट पाणी प्यावे,
*जेवणानंतर  एका तासाने पाणी प्यावे
◾पचनाच्या समस्या दीर्घकाळापासून असेल तर त्यांनी बस्ति पंचकर्म करुन घ्यावे
◾उदर परिक्षण,नाडी परीक्षण करुन घेऊन आयुर्वेदिक औषधोपचाराने पचनाच्या समस्या झपाट्याने कमी होतात
◾अनेक तपासण्या करुनही ज्यांना काही फायदा होत नसेल  त्यांना आयुर्वेदाने नक्की फायदा होतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या