calendar

header ads

टॉन्सिल - घसादुखी - टॉन्सिलसूज

टॉन्सिल - घसादुखी - टॉन्सिलसूज

जंतुदोषापैकी घसासूज व टॉन्सिलसूज या आजारांची कारणे व उपचार बरेचसे सारखे असल्याने हे एकत्र घेतले आहेत.

हे आजार (विशेषतः टॉन्सिलसूज) बहुधा लहान मुलांत जास्त प्रमाणात येतात. परंतु नुसती घसासूज कोणत्याही वयात आढळते. या आजारात घसा, टॉन्सिल लालसर होतात, सुजतात. त्याबरोबर ताप, अंगदुखी, इत्यादी लक्षणे दिसतात.

याबरोबर घसा दुखणे, गिळायला त्रास होणे.
मधून मधून कोरडा खोकला येतो.
घशात/ टॉन्सिलमध्ये टोचल्यासारखे वाटणे या तक्रारी प्रमुख असतात.

टॉन्सिल संदर्भात त्रास आहे असे समजताच रुग्णाचे नातेवाईक डॉक्टरांनाच सल्ला देतात की, काढून टाका. मानव शरीरात असणा-या प्रत्येक अवयवाचे आरोग्य दृष्ट्या महत्व असतेच, शरीरातील कोणताही अवयव विनाकारण निर्माण केलेला नसतो. प्रत्येक अवयवाला विशिष्ट काम करण्याच्या मर्यादा असतात, त्यामुळे शस्त्रक्रियेद्वारे एखादा अवयव शरीरातून काढणे म्हणजे त्या अवयवाचे शरीरासाठी उपयुक्त कार्य बंद करणे होय. मनुष्य शरीरात टॉन्सिल्स हे घशांत दोनही बाजूला असतात, हे मानवी शरीरातील गार्ड आहेत कारण घशांत किंवा अन्य कोणतेही इन्फेक्शन(जंतू) शरीरात प्रवेश करु नये याची ते काळजी घेत असतात. शरीरात प्रवेश करणा-या उपद्रवी जंतुंचा नाश करण्याच्या क्षमतेमुळे टॉन्सिल्स शरीरासाठी खुप उपयुक्त ठरतात. अनेक वेळा थंड हवामान, सर्दी इ. गोष्टींमुळे टॉन्सिलला सूज येते, ही सूज थोडया औषधोपचाराने बरी होऊ शकते पण जेव्हा खुप प्रमाणात सूज असते तेव्हा शस्त्रकर्म हा एकमेव पर्याय असतो.

कारणे

विषाणू किंवा जिवाणूमुळे घसादुखी, टॉन्सिलसूज होतात. ब-याच वेळा सर्दी-पडशानंतर हे दुखणे येते. हा आजार सांसर्गिक आहे.
याशिवाय रासायनिक प्रदूषण, वावडे (उदा. विशिष्ट खाद्यतेलामुळे), घशास ताण (खूप बोलणे), इत्यादी कारणांमुळे घसा सुजतो.

टॉन्सिल वाढण्याचे प्रमुख कारणांमध्ये थंड पदार्थांचे नित्य सेवन, थंड वारा-थंडी-पावसात भिजणे यांचा समावेश होतो. अन्य कारणांमध्ये अति बोलण्याचे श्रम, गरम आणि थंड पदार्थ आलटून पालटून घेत राहणे म्हणजे गरम चहा घेतल्यानंतर कोल्ड ड्रींक्स घेणे पुन्हा लगेच कॉफी घेणे इ., काही ना काही कारणांनी लहान मुले थंडी-ताप-खोकला-सर्दी विकाराने त्रस्त असणे, काही विषारी पदार्थांचे चुकुन सेवन करणे इ.
टॉन्सिल वाढणे या व्याधीचे लक्षणात प्रामुख्याने टॉन्सिलच्या ग्रंथींना सूज येते, घशाच्या आतील बाजूस स्वच्छ प्रकाशाद्वारे बघीतल्यास दोनही बाजूस लाल वाढलेल्या ग्रंथी - गाठी दिसतात, सोबत आतील बाजूस संपुर्ण घसा लालसर दिसतो. ताप येणे, गिळतांना त्रास होणे, बोलणे त्रासदायक असणे, आवाज बसणे, घशात सूई टोचल्या सारख्या वेदना होणे, सर्दी-खोकला विकार वाढतो, नेहमी नेहमी त्रास होत असल्यास भुक मंदावते, उंची वाढत नाही अथवा हळूहळु वाढते, कानातून पु येणे किंवा कान ठणकतो इ.

रोगनिदान

घसा सुजला तर घशाची पाठभिंत लालसर दिसते. टॉन्सिलच्या गाठी सुजल्या असतील तर त्या नेहमीपेक्षा मोठया दिसतात. गाठींचा पृष्ठभाग लालसर दिसतो.

कधीकधी टॉन्सिलवर पांढरट (पू) ठिपके दिसतात.

घसासूज असो की टॉन्सिलसूज, गळयातल्या रसग्रंथी सुजणे, दुखणे ही बहुतेक वेळा आढळणारी खूण आहे.

कधीकधी एका बाजूच्या टॉन्सिलच्या मागे पू जमून त्या बाजूची सूज मोठी दिसते. अशा आजारात मात्र तज्ज्ञाकडे पाठवणे योग्य ठरेल.

घशाची तपासणी करण्यासाठी जीभ खाली दाबून धरण्यासाठी साधा स्वच्छ चमचा वापरावा. नीट दिसण्यासाठी बॅटरीचा उजेड किंवा सूर्यप्रकाश लागतो.

उपचार

- गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या कराव्यात. गरम दूध-हळद प्यायला द्यावी. या उपायांनी घशाला शेक मिळून लवकर आराम पडतो. ब-याच वेळा केवळ एवढया उपायानेच घसासूज कमी होते. गुळण्या दिवसातून चार-पाच वेळा कराव्यात.

- लाळ सुटण्यासाठी खडीसाखर, हळद-गूळ गोळी मधून मधून तोंडात ठेवावी.

टॉन्सिलसुजेवर हळदपूड लावणे हा चांगला उपाय आहे. आपला अंगठा थोडा ओला केल्यास अंगठयास हळद चिकटते. मोठया माणसांना स्वतःच्या अंगठयाने टॉन्सिलवर हळद लावणे सहज शक्य आहे.

लहान मुलांना घशात हळद लावताना मात्र थोडे कौशल्य लागते. यासाठी आपल्या अंगठयावर किंवा ओल्या कापसाच्या बोळयावर हळदपूड घेऊन, मुलाचे तोंड उघडून चटकन हळदपूड टॉन्सिलवर लावावी. बोट चावले जाऊ नये म्हणून एका बोटाने मुलाचा गाल बाहेरून दातांमध्ये दाबून ठेवावा. हळद दोन्ही बाजूला लावावी.

या उपायाने ठणका व सूज कमी होते. हळद लावताना मागच्या पडजिभेस किंवा घशाच्या पाठभिंतीस स्पर्श झाल्यास उलटी होण्याची शक्यता असते, पण त्याने काही बिघडत नाही.

याबरोबरच सकाळ-संध्याकाळ गरम पाण्यात मीठ-हळद मिसळून गुळण्या कराव्यात. याप्रमाणे दोन-तीन दिवस उपाय करावा.

मध-हळद चाटण हा देखील एक चांगला उपाय आहे.

टॉन्सिलला सूज आली आहे असे समजताच मीठ आणि कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्यात, सोबत हळद टाकली तरी चालते. आहारात शक्यतो कोमट पाणी, गर्मताजा द्रव आहार घ्यावा. कोमट पाण्यामुळे ग्रंथींना असलेली सूज कमी होण्यात मदत होतेकोणत्याही उपचाराने फरक पडत नसल्यास शस्त्रकर्म हा उपाय करावा.
पथ्यापथ्य संदर्भात विचार करावयाचा झाल्यास पथ्य पाळल्या शिवाय यात गत्यंतर नसते हे प्रथम लक्षात घ्यावे.हा आजार लहान मुलांना अधीक प्रमाणात आढळत असल्याने त्या बालकांना युक्तीपुर्वकथंड पदार्थांपासून दूर ठेवावे जसे आईस्क्रीम,थंड पेय, बर्फाचे गोळे, फळांना फ्रिजर मध्ये ठेऊन त्यांना बर्फ रुपात खाणे जसे द्राक्षांना फ्रिजर मध्ये ठेऊन त्याचाबर्फ बनवून खाणे, फ्रिजचे पाणी, पावसात भिजणे इ. तसेच दुधाचे पदार्थ खाणे, तेलकट-तळलेले-हॉटेलचेपदार्थ खाणे, आंबट पदार्थ खाणे टाळावे. सर्दी-ताप-खोकला येताच योग्य चिकित्सा करावी.
आहारात लसूण-पुसीना-ओली हळद-तुळस चटणी स्वरुपात असावी. नेहमी कोमट पाणी प्यावे. ज्वारीचा घाटा उत्तम द्रव आहारआहे. घसा-गळा यांनाथंड हवा लागु नये या दृष्टीनेसतत उबदार वस्त्राने तो भाग गुंडाळलेला असावा. अति बोलणे टाळावे.वेळीच योग्य उपहार केल्यास टॉन्सिल काढण्याची गरज नसते.

घसादुखीसाठी बाजारू गोळयांऐवजी (उदा. व्हिक्स) अर्धा चमचा जिरे + एक चमचा साखर तोंडात धरल्यास त्याचा रस पाझरून घसादुखी कमी होते. साखर लवकर विरघळते म्हणून आणखी एक-दोन वेळा घ्यायला हरकत नाही. हा उपाय लवकर केल्यास बहुतेकदा घसादुखी इतर काही न करता थांबते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या