calendar

header ads

स्त्रीयांमधील थायरॉईड वाढीचे दुष्परिणाम

स्त्रीयांमधील थायरॉईड वाढीचे दुष्परिणाम
शरीराच्या चयापचय क्रियेचं नियंत्रण ठेवणे हे थायरॉईडच्या ग्रंथीचं मुख्य कार्य आहे. ही एक लहान ग्रंथी असून तिचा आकार एका फुलपाखरासारखा असतो आणि ती मानेच्या खालच्या भागात स्थित असते. नोकरी-व्यवसायामुळे महिलांचे जीवन धकाधकीचे बनू लागले आहे. त्यामुळे त्यांचे प्रकृतीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामध्ये जेवणाच्या वेळा न पाळणे, रात्री उशिरापर्यंत जागरण करणे, जंक फूड खाणे, व्यायामाचा अभाव यामुळे स्त्रियांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे लठ्ठपणा, थायरॉईड ग्रंथीचे विकार म्हणजे पीसीओडी, स्तनाचा कॅन्सर या आजारांचे वाढते प्रमाण होय.

थायरॉईड ही एक लहान ग्रंथी असून तिचा आकार एका फुलपाखरासारखा असतो आणि ती मानेच्या खालच्या भागात स्थित असते. तिचं मुख्य कार्य म्हणजे शरीराच्या चयापचय क्रियेचं नियंत्रण ठेवणे (जगण्यासाठी आवश्‍यक कार्यं पेशी ज्या गतीनं करतात तो दर).

चयापचय नियंत्रणात ठेवण्यासाठी, थायरॉईड संप्रेरकांचं उत्सर्जन करते, जे शरीरातील पेशींना किती ऊर्जा वापरायची ते सांगतात. योग्यप्रकारे काम करणारी थायरॉईड शरीराची चयापचय क्रिया समाधानकारक गतीनं चालू ठेवण्यासाठी आवश्‍यक प्रमाणात संप्रेरकांचं उत्पादन करते. संप्रेरक हे जसजसे वापरले जातात तशी त्यांची भरपाई थायरॉईड ही करत असते. रक्तातील थायरॉईड संप्रेरकांचं प्रमाण हे पोषग्रंथिव्दारे (पिट्युटरी ग्रंथी) केले जाते. मेंदूच्या खालच्या भागात कवटीच्या मध्यभागी स्थित असलेल्या ह्या पोषग्रंथीला जेव्हा अतिप्रमाणातील किंवा कमी प्रमाणातील थायरॉईड संप्रेरकांची जाणीव होते, तेव्हा ती आपला संप्रेरक (टीएसएच) कमीजास्त करते आणि तो थायरॉईडला पाठवून तिला काय करायचे ते सांगते.

नोकरी-व्यवसायामुळे महिलांचे जीवन धकाधकीचे बनू लागले आहे. त्यामुळे त्यांचे प्रकृतीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामध्ये जेवणाच वेळा न पाळणे, रात्री उशिरापर्यंत जागरण करणे, जंक फूड खाणे, व्यायामाचा अभाव त्यामुळे स्त्रियांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे लठ्ठपणा, थायरॉईड ग्रंथीचे आजार पीसीओडी, स्तनाचा कॅन्सर या आजाराचे वाढते प्रमाण होय.

सध्या पीसीओडी या आजाराचे प्रमाण वाढत आहे. वयात येणाऱ्या मुलींपासून ते मध्यमवर्गीय महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. या आजारी कारणे-
अनुवंशिक
लठ्ठपणा
व्यायामाचा अभाव

या कारणांमुळे महिलांमध्ये अँडोजेन या हार्मोनचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्यांना खालील लक्षणे दिसून येतात.
लठ्ठपणा, मासिक पाळी उशिरा येणे, वेळेवर न येणे, रक्तस्त्राव कमी होणे, वंध्यत्व, केस विरळ होणे, टक्कल पडणे, ओठांवर तसेच स्तनावर केसांची वाढ होणे.

शिवाय या आजारामुळे शरीरातील पशींचे इन्शुलिन घेण्याची क्षमता कमी होते व त्यामुळे रक्तातील साखर वाढते. याला इन्शुलिन रेसिसटन्स डायबेटिस म्हणतात. या आजाराचे निदान सोनोग्राफी, तसेच रक्तातील अँन्डोजीन या हार्मोनच्या प्रमाणावरून लक्षात येते. पोटाची सोनोग्राफीमध्ये केल्यानंतर अंडाशयामध्ये छोट्या छोट्या गाठी दिसून येतात.

या आजारावरील उपचार म्हणजे दैनंदिन जीवनशैलीत बदल करणे आवश्‍यक असते. वजनावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. वजन उंचीच्या प्रमाणात ठेवणे आवश्‍यक आहे. त्यासाठी नियमित व्यायाम गरजेचा आहे. ज्या महिलांना पीसीओडी या आजाराचा त्रास होत असेल, तर तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून उपचार आणि औषधोपचार करून घ्यावेत.
चाळशीनंतरच्या प्रौड महिलांमध्ये होणारा थायराइड ग्रंथींचा आजार आहे. हा ऑटोयुमीन आजार आहे. जर तुम्हाला हा आजार असेल, तर तुमच्या क्‍लोज फॅमिली मेंबरला होऊ शकतो.
1) वंश
2) वाढते वय
3) अकाली केस पांढरे होणे, कोरडे होणे.
4) मधुमेह
5) संधीवात,
6) डाऊन सिम्डोन
7) मानसिक आजार
9) रक्तक्षय या आजारांचा समावेश आहे.

थायरॉईड वाढीची लक्षणे-

1) मासिक पाळीत बदल होणे (अनियमितता).
2) बद्धकोष्ठता 3) नैराश्‍य
3) केस कोरडे (अकाली पांढरे होणे)
4) कोरडी त्वचा
5) थकवा जाणवणे
6) थंडीचा त्रास होणे
7) हृदयाची ठोक्‍याची गती मंदावणे
8) ग्रंथीला सूज येणे
9) विशेषत: गळ्याखालील ग्रंथींना सुज येणे
10) अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे.

आईच्या थायरॉइड ग्रंथीचा आजार असल्यामुळे बाळाला जन्मजात थायरॉइडचा विकार होऊ शकतो.-

1) मतिमंद, 2) हात पाय थंड पडणे, 2) बद्धकोष्ठता 3) खूप झोप येणे 4) चिडचिडपणा 5) वाढ खुंटणे किंवा मंदावणे 6) स्नायू शिथील होणे 7) कावीळ बरा न होणे 8) खाण्याच्या सवयी बिघडणे 9) तोंडाला सूज येणे 10) पोट वाढणे, 11) जीभ जड होणे, अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्‍टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार करून घ्यावेत.

थायरॉइडचे निदान –
वरीलप्रमाणे लक्षणे आढळल्यास डॉक्‍टरांकडून टीएफटी नावाची तपासणी करून घ्यावी. या तपासणीमध्ये टी-3, टी-4 आणि टीएचएस अशा तीन चाचण्यांचा समावेश असतो. या चाचण्यांमध्ये जर कमी जास्तपणा आढळला, संप्रेरकाचे प्रमाण कमी असेल किंवा जास्त असेल, तर डॉक्‍टरांकडून उपचार करून घ्यावेत.

थायरॉइड आजार असेल, तर त्यावर त्वरित उपचार करून घ्यावेत. गरोदर महिलेच्या होणाऱ्या बाळावर मानसिक व शारीरिक दुष्परिणाम होऊ शकतात. गरोदरपणात पहिल्या तीन महिन्यात बाळाला आईकडून सगळे थायरॉइड संप्रेरक मिळत असते. जर आईमध्ये थायरॉइडचे प्रमाण कमी असेल, तर बाळाला थॉयराइड हार्मोन ळणार नाही आणि त्यामुळे बाळ मतिमंद जन्माला येऊ शकते.

जर एखाद्यामध्ये टी4ची लेव्हल खूपच कमी असेल, तर ते त्याच्या जीवावर बेतू शकते. अशा वेळेस शरीराचे तापमान जर नियंत्रणात राहिले नाही, तर बाळ दगावू शकते.

गरोदरपणामध्ये नऊ महिन्यामध्ये थायरॉइड संप्रेरकचे प्रमाण वेगवेगळे असते. त्याचे प्रमाण डॉक्‍टरांनी सांगितल्याप्रमाणे असणे गरजेचे आहे.
थायराइडच्या तपासणीमध्ये टीएसएचचे प्रमाण कमी जास्त असेल, तर थायरॉइडची पूर्ण तपासणी करून घेणे गरजेचे आहे. कधी कधी काही महिलांची थायरॉइड ऍन्टीबॉडी नावाची तपासणी करण्याची गरज असते. डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनाने ती करून घेणे गरजेचे आहे. त्यामध्ये जर काही अडचणी असतील, तर त्यावर उपचार करून घेणे महत्त्वाचा आहे. गरोदरपणामध्ये थायरॉइडची तपासणी दर दोन महिन्यांची करून उपचार करण्याची गरज आहे.

महत्त्वाचे काही ः

ज्या स्त्रियांनी किरणोत्सारक आयोडीन याद्वारे औषधोपचार घेतला असेल, तर प्रसुती ठेवायला नको आणि आपल्या थायरॉइडची गोळीचे प्रमाण डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनाने प्रसुती होण्यापूर्वी कमी करावे. खालील कारणांमुळे महिलांना थायरॉइड ग्रंथीचा आजार होऊ शकतो.

1) वय 30 चे पुढचे
2) आयोडीन कमी असलेल्या भागात राहणे
3) स्वतःमध्ये किंवा फॅमिलीमध्ये असलेला थायरॉइड प्रॉब्लेम
4) टाईप-1 मधूमेह,
5) वारंवार गर्भपात होणे
6) वंध्यत्व,
7) कमी दिवसांची प्रसुती
8) ज्यांचा बीएमआय 40 (अतिलठ्ठपणा) किंवा त्यापेक्षा जास्त आहे,
9) काही औषधांचे दुष्परिमाम
10) नुकतीच केलेली क्ष-किरणांसाठी डाय वापरून केलेली क्ष-किरण तपासणी करणे.

गर्भवती स्त्रीला होणारे दुष्परिणाम-
1) गर्भपात होणे 2) रक्तक्षय 3) गर्भवतीचा रक्तदाब वाढणे, 4) गर्भाशयामध्ये अडचणी येणे, 5) प्रसुतीनंतर खूप रक्तस्त्राव होणे.

थायरॉइड संप्रेरकाचे प्रमाण कमी असलेल्या गर्भवती स्त्रिच्या बाळाला होणारे दुष्परिणाम
1)कमी दिवसांचे बाळ जन्माला येणे
2) जन्मतःच वजन कमी असणे
3) श्‍वसनाचे आजार होणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या