हाडांचा ठीसुळपणा एक गंभीर समस्या
(ऑस्टीओपोरोसीस )
@ हाडे ठीसूळ होतात म्हणजे नक्की काय ?
आपली हाडे सच्छिद्र असतात .ती अधिक सच्छिद्रहोतात. किंचित अपघाताने फ्राक्चर(हाडे मोडण्याची) होण्याची शक्यता वाढते.त्यावरील कॅल्शीयमचे प्रमाण कमी होते.असे होणे म्हणजे ठीसूळपण होय.
@ आपली हाडे ठिसूळ आहेत हे कसे ओळखावे ?
बोन डेनसिटी या अत्याधुनिक तपासणी द्वारे ठिसूळपण ओळखता येतो.
अन्यथा हाडे ठिसूळ झाल्याचे ,हाड मोड्ल्यानंतरच बर्याच वेळा लक्षात येते
@ याची लक्षणे काय असतात?
कंबर दुखणे ,ताठवाटणे ,मान दुखणे,खांदा ,खुबा,मणक्यात वेदना जाणवणे.
स्त्री/पुरुष यात काय फरक असतो .
@ स्त्री / पुरुष यानुसार यात काही फरक असतो का ?
ठिसूळपण वाढून हाडे मोडण्याचे प्रमाण स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा चारपट जास्त असते.मासिकपाळी थांबल्यानंतर ठिसूळपण वेगाने वाढतो.गर्भारपण,स्तन्यपान,या काळात कॅल्शियम कमी पडल्याने ठिसूळपणा वाढतो. पुरुषांत वयाच्या साठीनंतर याचे प्रमाण वाढते.जास्त कष्टाची कामे करणार्यांत ठिसूळपणा जास्त दिसतो.
@हाडे ठिसूळ होण्याची करणे कोणती?
अनुवंशिकता(मात्या-पित्याकडून आलेला दोष )व्यायामाचा आभाव,दारू,तंबाखू,सिगरेट,गुटखा अशी घटक स्वरुपाची व्यसने,वेदनाशामक औषधे (स्तेरोइडस)जास्त प्रमाणात घेणे,स्त्रियांची मासिक पाळी कमी वयात बंद होणे.
@ यावर कोणते उपचार आहेत?
प्रतिबंध हाच खरा उपचार होय.औषधांचा उपयोग आपल्या डॉक्टरांच्या साल्यानेच करावा.
@ या आजाराला प्रतीब्वंध कसा घालावा?
कॅल्शियमयुक्त आहार घ्यावा.नियमित पणे व्यायाम करावा.व्यसनमुक्त,ताण-तणाव मुक्त जीवनशैलीचा अंगीकार करावा.
@ कोणत्या प्रकारच्या आहारातून कॅल्शिअम मिळते?
दुध ,मासे,अंडी,हिरव्या रंगाच्या पालेभाज्या ,बीट,सुकामेवा ,डाळी,नाचणी यातून कॅल्शिअम मिळते.(दुध १कप = ३००मि.ग्र. कॅल्सिं.)
@ कोणते पदार्थ टाळावेत ?
खारवलेले पदार्थ ,कॉफी ,चोकलेट,दारू,तंबाखूजन्य पदार्थ ,शीतपेय ,काही पित्तावरील औषधे .
@ कोणत्या प्रकारचा व्यायाम करावा ?
चालणे (किमान १मैल ),सावकाश धावणे,तसेच संपूर्ण शरीराची हालचाल होईल अश्या प्रकारचे व्यायाम करावेत.योगासने करावीत,पोहणे,सायकलिंग ,याचाही चांगलौपायोग होतो.आठवड्यातून किमान तीन दिवस कोवळी सूर्यकिरणे अंगावर पडू द्यावीत .
@ कॅल्सियामची गरज कोणाला किती आहे?
१ वर्षापेक्षा कमी वय -- २००ते २६०मि.ग्र .
१-३ वर्ष -- ७०० मी.ग्र.
४-८ वर्ष -- १००० मी.ग्र.
९-१८ वर्ष -- १३०० मी.ग्र.
१९-५० वर्ष -- १००० मी.ग्र.
५१-७० वर्ष पुरुष --१२०० मी.ग्र.
५० वर्षापुढील स्त्रिया -- १२०० मी.ग्र.
@ हाडे ठिसूळ झाल्यास ((ऑस्टीओपोरोसीस ) कोणती काळजी घ्यावी ?
प्रथमतः आपल्या डॉक्टरांच्या सल्याने उपचार करावेत.पाय घसरणार नाही अश्या स्वरूपाच्या चप्पला वापराव्यात.बाथरूम,संडास यासारख्या ओलसर जागी काळजीपूर्वक वावरावे.काठीचा किवा तसंम आधार वापरावा.
समस्त मानवाला पिडणाऱ्या विकारांत अस्थि किंवा हाडांच्या विकारांची संख्या खूप आहे. मेंदूची कवटी, नाकातील हाडे, कानांतील तीन हाडांची साखळी, मान, पाठ व कंबर येथील अनेक मणक्यांचे विकार, खांद्याची हाडे; दांत, हिरडय़ांचे आजार, गुडघे, टाचेची हाडे अशा विविध विकारांत सब घोडे बारा टक्के असे औषधोपचार कोणत्याच वैद्यकशास्त्रात नाहीत. दिवसेंदिवस मान, पाठ, कंबर, गुडघे व टाचेच्या हाडांच्या विकारांची वाढती संख्या ही मोठी चिंतेची बाब होऊन बसली आहे. या पाच विकारांकरिता विविध गुग्गुळकल्प मोठेच योगदान देत असतात. या हाडांच्या विकारांचा विचार करताना हाडांची झीज, कटकट आवाज, आराम केल्यास बरे वाटणे, रक्ताचे, दैनंदिन कामाचे स्वरूप; जेवण घरचे का बाहेरचे; लोणची, पापड सारखे अधिक मीठ असणारे पदार्थ; कोल्ड्रिंक, फ्रिजचे पाणी व सर्वात महत्त्वाचा विचार म्हणजे रुग्णाचे वय याचा विचार प्रामुख्याने करावा लागतो.
हाडांच्या विकारात आवाज येणे ही तक्रार जास्त असली तर कटाक्षाने मीठ टाळावे. खूप जिने चढउतार, दगदग, जास्त वजन उचलणे टाळावे. कृश रुग्णांनी ताजे घरगुती लोणी किंवा तुपाचा अवश्य वापर करावा. जेवणात उडीद, मूग, ओले खोबरे, शेंगदाणे, तीळ यांचा वापर असावा. धूम्रपान, तपकीर, तंबाखू, मद्यपान अशी व्यसने अवश्य टाळावीत. कांही अस्थि विकारग्रस्त मंडळी डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे कॅल्शिअमच्या खूप गोळ्या कायम घेत असतात. पण त्याचा रुग्णांना विशेष लाभ होत नाही. दूध, पालेभाज्या, मोड असलेली कडधान्ये; ताडगोळे, सफरचंद, डाळिंब, पपई, खरबूज अशी फळे आलटून-पालटून खावीत. जागरण व रात्रौ उशिरा जेवण टाळावे. बाह्येपचारार्थ खूप प्रकारची तेले वापरात असल्यास, संबंधित अवयवांत आपण लावत असलेले तेल जिरले पाहिजे याकडे लक्ष असावे. आपल्या घरात रोजच्या वापरात असणारे गोडे तेल थोडे कोमट करून त्यात थोडे मीठ मिसळून; दुखऱ्या किंवा सूज असणाऱ्या अवयवांमध्ये जरूर जिरवावे. कानाच्या व मेंदूच्या अस्थि संबंधित विकारांत, शरीरातील लोहाच्या प्रमाणावर लक्ष ठेवावे लागते. अस्थि विकारांत थोडे दूरचे नियोजन करावे लागते. कोणताही ‘शॉर्ट कट’ उपयोगी पडत नाही हे लक्षात असावे.

0 टिप्पण्या