calendar

header ads

सांधेदुखीसाठी कायमस्वरुपी उपचार-
◾सांधेदुखीमध्ये  धावपळीच्या फास्ट युगात सर्वांना झटपट शाॅर्टकट पध्दतीने आराम हवा असतो भलेही तो तात्पुरता असो किंवा त्याचे साइड इफेक्ट होवो.आजची वेदना पेनकिलरने कमी झाली पाहिजे उद्या शरीराचे काही झाले तरी चालेल.
◾शरीराचे असे आबाळ होता कामा नये.दीर्घकाळ निरोगी रहायचे असेल तर आत्तापासून शरीराची काळजी घ्या.आजार कायमस्वरुपी व नैसर्गिक पद्धतीने कमी होईल याची काळजी घ्या.थोडा त्रास असेल तर लगेच पेनकिलर घेणे टाळा.
◾आयुर्वेदानुसार शरीरात आमवात,वातरक्त,आवृत्त वात,सामनिराम वात,यांसारख्या कारणामूळे सांधेदूखीचा त्रास व्हायला लागतो.
◾शरीरातील वाताचे समूळ उच्चाटण करणे शक्य आहे ते म्हणजे आयुर्वेदिक शरीरशुध्दी पंचकर्म या पद्धतीने!अनेक व्याधीस आजांरास कारणीभूत दोष पंचकर्माने शरीराबाहेर काढले की शरीर निर्वीकार निरोगी होणार हे निश्चित !
◾बस्ति,विरेचन,वमन,रक्तमोक्षण,पिण्डस्वेद,जानुबस्ति,जलौका,
अग्निविद्ध कर्म यांसारख्या पंचकर्म उपायांनी रुग्ण खात्रीशीरपणे बरा व्हायला लागतो हे निश्चित!हे सर्व उपाय रुग्णांना एकदाच करायची गरज नसते.वैद्य तुम्हाला जे आवश्यक आहे तेच पंचकर्म करायला सल्ला देतील जेणेकरुन तुमची सांधेदुखी कमी व्हायला मदत होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या