❂ दिनविशेष ❂*
━═●●═━
🛡 *★10. जानेवारी★* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★हा या वर्षातील १० वा दिवस आहे.
~~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९६६ : भारत व पाकिस्तान यांच्यात ’ताश्कंद करार’ झाला.
●१९२६ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ ‘श्रद्धानंद’ साप्ताहिक मुंबईत सुरू केले.
●१९२० : पहिले महायुद्ध – व्हर्सायचा तह अस्तित्त्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले.
●१६६६ : सुरत लुटून शिवाजीमहाराज राजगडाकडे निघाले.
~~*★जन्मदिवस / जयंती★*~~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७४ : हृतिक रोशन – सिनेकलाकार
◆१९४० : के. जे. येसूदास – पार्श्वगायक व संगीतकार
◆१९०१ : इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे यांचा पनवेल येथे जन्म
◆१९०० : मारोतराव सांबशिव कन्नमवार – महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री
◆१८९६ : नरहर विष्णू तथा ’काकासाहेब’ गाडगीळ – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल
~~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२ : पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास – ख्यालगायक, गुरु व बंदिशकार (जन्म: ९ नोव्हेंबर १९२४)
●१९९९ : आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर – स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत
●१७७८ : कार्ल लिनिअस – स्वीडीश वनस्पतीतज्ञ, वनस्पतींच्या दुहेरी नामकरणाची आंतरराष्ट्रीय पद्धत त्याने विकसित केली.
●१७६० : दत्ताजी शिंदे – पानिपतच्या पहिल्या संग्रामातील रणवीर
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१० जानेवारी १६६४*
छत्रपती शिवाजी महाराज सूरतेहून राजगडाकडे निघाले. महाबत खान सुरतेच्या बचावासाठी येत असल्याने ४ दिवस सूरत लुटल्यानंतर जमा झालेली अर्धी लुट जमीन मार्गाने राजगडाकडे चालवली तर बाकीची अर्धी सागरी मार्गाने कोकणात. ह्या लुटीमधून उभे राहणार होते दुर्गम असे जलदुर्ग आणि अनेक इतर किल्ल्यांची दुरुस्ती होणार होती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१० जानेवारी १७२४*
बाजीराव-पोर्तुगिज यांच्यात तह झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१० जानेवारी १७३०*
शनिवारवाड्याचे बांधकाम १७३०ला सुरू झाले, तर २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवारवाड्याची वास्तूशांत करण्यात आली.
शनिवारवाड्यासंबंधी अनेक घटना, दुर्घटना आहेत. वाड्यातील पेशव्यांच्या कार्यालयात अनेक वीर आणि मुत्सद्दी येत. राजकारणाचे येथे फड रंगत, पेशव्यांचा दरबारच येथे होता. पेशव्यांच्या घरातील मुलामुलींची लग्ने याच वाड्यात होत. शनिवारवाड्यासमोरील पटांगणात मोहिमेला जाणारे सैन्य जमे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१० जानेवारी १७३४*
बाजीरावाविरुद्ध लढताना सिद्दी अंबर अफबानीचा रायगडाखाली पराभव होऊन मृत्यू.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१० जानेवारी १७३९*
इ.स १७३९च्या वसई मोहिमेत माहिम किल्ल्यावरील विजयानंतर १० जानेवारी १७३९ रोजी केळवे किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. केळवे पाणकोटा प्रमाणे हा किल्ला सुध्दा इतिहासकालात समुद्रात होता. पण समुद्र मागे हटल्यामुळे किल्ल्याला भूईकोटाचे स्वरुप प्राप्त झालेले आहे. काही वर्षापूर्वी हा किल्ला पूर्ण वाळूखाली गाढला गेला होता. ‘किल्ले वसई मोहिमे’ अंतर्गत २००८-०९ साली या किल्ल्याभोवतीची वाळू उपसून किल्ल्याचा पहिला मजला मोकळा करण्यात आला आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१० जानेवारी १७६१*
*_बचेंगे तो और भी लढेंगे - दत्ताजी शिंदेंना वीरमरण_*
संक्रातीचा सण असून मराठी फौज सकाळी स्नान करून, तिळगुळ खाऊन तयारीने बसली होती. सकाळी नजरेच्या टप्प्यात यायच्या आत गिलचे चारही घाटांवर ८ मैलांवर आले आणि त्यांनी तोफांच्या सहाय्याने मराठ्यांवर हल्ला चढवला. पाठोपाठ बंदुकधारी रोहील्यांचे पायदळ नदीपार करण्यास पुढे येऊ लागले. बुराडी घाटावर जानराव वाबळे याची नेमणूक केलेली होती. मराठी सैनाची मुख्य शस्त्रे म्हणजे तलवारी, भाले असून फार कमी शिपाई बंदुका वापरीत. त्याउलट रोहिले - अफगाण बंदुकधारी असून जोडीला त्यांनी तोफखाना देखील आणला होता. मराठ्यांचा तोफखाना मुख्य तळावर राहिल्याने शत्रूच्या हल्ल्याला त्यांना समर्थपणे तोंड देता आले नाही. अफगाणी सेनेच्या तोफांनी बुराडी घाटावर जानरावचे शंभर - दीडशे शिपाई मारले गेले.
दत्ताजी बुराडी घाटावर आला. दत्ताजी आल्याने सैन्याला धीर मिळाला व ते शत्रूचा नेटाने मुकाबला करू लागले.आपली तलवार गाजवू लागला परंतु दुदैवाने रोहील्यांच्या गोळीबारात मराठ्यांचा हा रणशूर सेनानी घोड्यावरून खाली आला. दत्ताऽऽऽ" म्हणून कुतुबशहाने हाक दिली तसे दत्ताजींनी त्याच्यावर डोळे रोखले. जणू काही डोळ्यांतच अंगार फुटावा तसे डोळे भयंकर दिसू लागले. कुतुबशहा खिंकाळत म्हणाला,
" क्यूं पटेल, और लढोगेऽऽऽ?"
आपला थंड पडत चाललेला आणि मंद मंद होत चाललेला आवाज दत्ताजींनी एकवटला आणि ते बाणेदारपणे उदगारले,
*_"क्यूं नही ? बचेंगे तो और भी लढेंगे ऽऽऽऽ!"_*
कुतुबशहा व नजिब चिडून दत्ताजींच्या उरावर जावून बसले अन् खंजीराने दत्ताजींची गर्दन चराचर चिरली. नजीब भाल्याच्या टोकाला खोचलेली दत्ताजींची भेसूर मुंडी नाचवत नाचवत अब्दालीकडे गेला. त्या दिवशी दिवसभर मराठ्यांचा भयंकर पाठलाग सुरू होता. कोंबड्या बकर्यांसारखी माणसं टिपून मारली जात होती. यमुना काठ रक्तानं निथळत होता. रात्रीच्या भयाण अंधारात मराठ्यांनी दत्ताजींचे लपवलेले धड बाहेर काढले। खिळखिळ्या झालेल्या तोफेचं लाकूड सामानं एकत्र केलं. यमुनाकाठच्या वाळूतच सरण रचलं. रानावनात कफन नाही म्हणून सोबत्यांनी नेसूची धोतरे सोडली. रणवीराचा उघडावाघडा देह झाकला. बटव्यातल्या सुपार्या आणि पाने सरणावर ठेवली. दत्ताजींच्या मानेच्या तुटलेल्या भागाला, अन्ननलिकेलाच तोंड समजून सोबत्यांनी पाणी पाजले. भयाण रात्रीच्या घोंगावत्या वार्यात आणि यमुना नदिच्या खळखळ आवाजात मृतदेह पाणी प्याला. उघड्यावरच आग लावली.
त्या दिवशी महाराष्ट्रात संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ, रेवड्या वाटल्या जात होत्या. सणासुदीची माणसं भरपेट खाऊन उताणी झाली होती. तेव्हा कण्हेरखेडच्या शिंद्यांचा कृष्णाकाठच्या मातीत खेळून पोसलेला देह यमुनाकाठच्या वाळूत बिनशिराचा धडाधडा जळत होता !
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१० जानेवारी १७७५*
दुसर्या बाजीरावाचा जन्म,
बाजीराव हा रघुनाथराव आणि आनंदीबाई यांचा मुलगा होता. आनंदीबाई यांना नारायणराव पेशव्यांच्या खुनाच्या आरोपाखाली माळवा प्रदेशातील धारच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. येथेच १० जानेवारी १७७५ ला त्यांनी बाजीरावास जन्म दिला. बाजीराव जन्मापासून ते वयाच्या १९ व्या वर्षापर्यंत नजरकैदेतच वाढला. इतर पेशव्यांना जसे लष्करी पद्धतीचे शिक्षण मिळाले होते व त्यांचे व्यक्तिमत्त्व जसे बहुआयामी घडले होते तसे व्यक्तिमत्त्व दुसरा बाजीराव यांस मिळाले नाही कारण त्याचे शिक्षण मुख्यतः फक्त भिक्षुकी शिक्षण झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट* 🚩

0 टिप्पण्या