calendar

header ads

महाशिवरात्र

२. महाशिवरात्र
भारतीय संस्कृती, सौंदर्य, तत्त्वज्ञान ह्याला जगात तोड नाही. श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगून आपल्याला.नव्हे तर जगाला कार्यप्रवृत्त केले. त्याचप्रमाणे भगवान शंकराने हजारो भक्तांना, ऋषी-मुनींना व देवाप्रमाणे दानवेंना सुद्धा प्रसन्न होऊन 'वर' दिले. मानवी जीवनाची प्रणाली, तत्वे शिकवली. अशा भोळ्या शंकराप्रीत्यर्थ जो दिवस उत्सवदिवस म्हणून भक्तीने पाळला जातो. त्याला आपण.महाशिवरात्र म्हणतो. प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशी शिवरात्र म्हणतात. परंतु माघ महिन्यातील शिवरात्र विशेष महत्त्वाची मानली जाते.
              या दिवशी शिवलिंगास अभिषेक करून एकशेआठ किंवा सहस्त्र बिल्वपत्रे वाहून उपवास करतात.शिवमंदिरात रात्रभर जप, स्तोत्रे म्हटली जातात प्रत्येक त्रयोदशी शिवरात्र मानून शिवाची प्रदोष पूजा करतात.सोमवार हा शिवाचा वार असल्यामुळे सुवासिनी सोळा
सोमवारचे व्रत करतात. श्रावणातील सोमवारला विशेष महत्त्व आहे. श्रावाणातील सर्व सोमवार अतिशय पूज्य मानले जातात.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या