calendar

header ads

वास्तुशास्त्र


   *वास्तुशास्त्र:*
हे वास्तुदेवता,
तुम्हाला आमचा नमस्कार,तुम्ही सदा आमच्या वास्तूमधील भू-शय्येवर शयन करीत असतात. तुम्ही आम्हाला धन-धान्य,सुख,शांती,समृद्धी,आरोग्य प्रदान करावे. हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे. ज्याप्रमाणे महामेरू पर्वत सर्व देव-देवतांचे निवासस्थान आहे, त्याचप्रमाणे ब्रह्मादि सर्व देव आमच्या वास्तुत वास्तव्य करतील असा आशीर्वाद द्यावा ही प्रार्थना.

*वास्तू शब्दाचा अर्थ:*
वास्तू' हा शब्द संस्कृतमधील 'वास' या मूळ शब्दापासून तयार झाला आहे. याचा अर्थ मनुष्याच्या निवासासाठी योग्य भवन असा होतो. यासंबंधी जे नियम किंवा सिद्धांत सांगितले गेले, ते एका शास्त्रात बांधले आहेत. त्यालाच वास्तुशास्त्र असे म्हणतात.
***
घर असावे वास्तुशास्त्राप्रमाणो!
आपण घर घेताना सगळ्यात जास्त काळजी घेत असतो. कारण घर एक अशी वास्तू आहे की, ते मांगल्याचं प्रतीक मानले जाते. माणसांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठे ध्येय असते की, आपलं एक सुंदर घर असायला हवं; पण घर घेताना आपण घर हे खूप पॉश ठिकाणी बघत असतो. बर्‍याच वेळेला वास्तुशास्त्रानुसार ते घर योग्य आहे का? हेच आपण बघत नाही, त्यामुळे आपल्या घरात काही विचित्र गोष्टी घडत असतात; परंतु आपल्याला ते लक्षात येत नाही की, असं का होतंय. वास्तुशास्त्राची रचना करताना अनेक प्राचीन ऋषींनी खूप खोलवर विचार केलेले ग्रंथ लिहिलेले आहेत.

या वास्तुशास्त्रानुसार घर असले, तर घरही सुंदर होते व घरात शांतताही प्रस्थापित होते. बेडरूम, किचन, हॉल, देवघर हे सगळे वास्तुशास्त्रानुसार हवे. गृहिणी स्वयंपाक करताना पूर्व, उत्तर दिशेला हवे. देवघर हे ईशान्येच्या कोपर्‍यात असायला हवे. किंवा पूर्व-पश्‍चिमेला असायला हवे. बेडरूम ही नैर्ऋत्यास असायला हवी. प्रवेशद्वार हे उत्तर, पूर्व दिशेला असणे अत्यंत शुभ मानले जाते. घरात तुटलेली भांडी ठेवू नये. काचेच्या तुटलेल्या वस्तू ठेवू नयेत, त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो.

महाभारताच्या युद्धाचे चित्र, ताजमहल, नटराजाची मूर्ती, बुडणारे जहाज, फवारा, जंगलातील जनावरांचे फोटो आदी चित्र घरात ठेवू नयेत. असे मानले जाते की, जशी घरात चित्र असतात तसेच वातावरण घरात तयार होत असते; पण आपल्याला कधी कळून येत नाही. वास्तुशास्त्रानुसार १००% घर असणे, ही एक कल्पना आहे. हे आपल्याकडून कधीच शक्य होत नाही. वास्तूमध्ये काही ना काही दोष तर हे राहणारच.. ते दोष कमीत कमी राहतील म्हणून वास्तुशास्त्रानुसार रचना करावी, त्यामुळे आपल्या घरात सुख-शांती येते.
***

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या