#अम्लपित्त #आयुर्वेद विचार व #चिकित्सा महत्व...
या व्याधीमध्ये अम्लगुणाने म्हणजेच आंबटगुणाने पित्त वाढते म्हणून ’अम्लपित्त’ असे म्हणतात. अम्लपित्त हा एका दिवसात होणारा आजार नाही. अनेक दिवसांपासुन चुकीच्या पद्धतीचे आहार-विहार (खान-पान व वागणं) असल्याने अम्लपित्त हा व्याधी होतो. म्हणून अम्लपित्त पुर्णत: बरा होण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागतो.
कारणे-
आहारासंबंधित कारणे-
१. जास्त तिखट, आंबट व खारट पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन.
२. अति मसालेदार, झणझणीत अन्न पदार्थ सेवन.
३. जास्त तळलेले, अतिउष्ण पदार्थ सेवन.
४. आंबवलेले पदार्थ खाणे उदा. इडली, डोसा, जिलेबी, ब्रेड इत्यादि.
५. बेकरीचे पदार्थ खाणे उदा. ब्रेड, पाव, केक, टोस्ट, बटर इत्यादि.
६. विरुद्धान्न सेवन उदा. केळीचे शिकरण, दही-दुध-भात, दुध-खिचडी इत्यादि.
७. वारंवार चहा पिणे (बाहेरचा चहा नेहमीच जास्त उकळलेला व वारंवार गरम केलेला असतो)
८. मद्यपान, धुम्रपान करणे.
९. वरच्यावर हाँटेल मध्ये जेवण करणे. (९०% अन्न पदार्थ शिळे असतात).
१०. पालेभाज्या जास्त खाणे. (मोठ्याप्रमाणात क्षार असतात)
११. लोणचे, पापड, चटण्या, मिरचीचा खर्डा रोजच्या जेवणात खाणे.
१२. नासवलेल्या दुधापासून तयार केलेले पदार्थ उदा. पनीर
विहारासंबंधित कारणे-
१. रात्री उशीरा झोपणे (जागरण करणे).
२. भुक लागली असतांना जेवण न करणे (वेळेत जेवण न करणे)
३. भुक नसतांना जेवण करणे (वेळ निघुन गेल्यावर)
४. जास्त उपवास करणे व चुकीचा फ़राळ करणे उदा. साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, तळलेले पदार्थ खाणे.
५. जेवणानंतर लगेच झोपणे.
६. दुपारी झोपणे.
७. जेवतांना जास्त पाणी पिणे.
८. शिळे अन्न खाणे.
९. व्यायामाचा अभाव.
१०. अतिउष्णतेच्या ठिकाणी काम करणे उदा. भट्टी.
११. मल व मूत्रांच्या वेगाचे धारण करणे.
ॠतू संबंधित कारणे-
१. पावसाळ्यात निसर्गताच शरीरात पित्तचा संचय होतो.
२. शरद ॠतूमध्ये (सप्टेंबर-आँक्टोबर) पित्ताच्या प्रकोपाचा काळ असतो.
लक्षणे-
१. अन्न पचन सुरळीत न होणे
२. वारंवार छातीत व पोटात जळजळणे किंवा आग पडणे.
३. वारंवार आंबट किंवा तिखट / करपट ढेकर येणे
४. घश्यात जळजळणे, आग पडणे.
५. पोटात दुखणे किंवा छातीत दुखणे.
६. पोटात जडपणा वाटणे, पोट फ़ुगल्यासारखे वाटणे,
७. डोकं दुखणे (शिरःशूल), चक्कर येणे.
८. वारंवार पित्ताची उलटी होणे.
९. मलप्रवृत्ती पातळ होणे.
१०. संपुर्ण शरीराची किंवा हातापायाची आग होणे.
११. भुक न लागणे.
१२. श्वास घेतांना छातीत दुखणे / त्रास होणे.
काय काळजी घ्याल?
आहारा विषयक-
१. तिखट, आंबट, खारट पदार्थ बंद करा.
२. मसालेदार पदार्थ टाळा.
३. आहारात फ़ळभाज्यांचा वापर वाढवा उदा. भेंडी, पडवळ, भोपळा, लाल-भोपळा, दोडकी, गिलके, शेवगा यांचा वापर करा.
४. डाळी- तूरीची डाळ टाळा. वरण, भाजीत मुगाची डाळ वापरा.
५. ज्वारीची नेहमीच भाकरी उत्तम.
६. फ़ळ- डाळींब, नारळ, काळ्या मनुका, खजूर वापरा.
७. रोजच्या आहारात गाईचे गावराण तुपाचा समावेश करा.
८. दुध, तुप, खडीसाखर, शतावरी कल्प रोज घ्या.
९. जास्त प्रमाणात मोहरी, हिंग, लसूण, तीळ वापरू नका.
विहारा विषयक-
१. रात्री लवकर झोपा (किमान १० वाजता झोपा)
२. सकाळी लवकर उठून व्यायाम करा (डाँक्टरांचा सल्ला घेऊन)
३. जेवणानंतर लगेच झोपू नका.
४. दिवसा झोपू नका.
चिकित्सा-
१. औषधोपचार- डाँक्टरांचा सल्ल्या नुसार.
२. पंचकर्म- स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन, बस्ती आवश्यकतेनुसार.
* स्नेहन -शरीराला बाहेरुन तिळ तेल/ औषधी वनस्पती सिद्ध तेल लावणे.
* स्वेदन- शरीराला वाफ़ देणे.
#वमन -ज्या उपक्रमात दोषांना उर्ध्वमार्ग म्हणजेच मुखावाटे बाहेर काढले जाते त्यास वमन असे म्हणतात. वमन म्हणजेच उलटी करून दोषांना बाहेर काढणे होय.
#विरेचन- शरीरातील वाढलेल्या तसेच दुषित झालेल्या दोषांना अधोमार्गाने (गुद्मार्गाने) शरीराबाहेर काढून टाकणे म्हणजे विरेचन होय. मुख्यतः पित्तदोषावरील पंचकर्मोपचार आहे. विरेचनाने शरीर शोधन सोपे आहे कारण नैसर्गिक मार्गाद्वारे (गुद्मार्गाद्वारे) दोष सहजतेने बाहेर काढले.
#बस्ती- ज्या उपक्रमात गुदमार्गाद्वारे औषधी काढे, सिद्ध तेल, औषधी सिद्ध दुध, मांसरस इ. द्रव्ये शरीरात प्रविष्ट केले जातात त्यास बस्ती म्हणतात.
३. पथ्य- अतिशय महत्वाचा भाग
४. व्यायाम- गरजे नुसार
आपल्याला वरील पैकी लक्षणे दिसत असल्यास त्वरीत डाँक्टरांची वेळ घ्या व शुद्ध आयुर्वेदिक उपचार करुन घ्या.

0 टिप्पण्या