calendar

header ads

शिवदिनविशेष

शिवदिनविशेष

शिवकालीन इतिहास
४ फेब्रुवारी इ.स.१६६०
कोकणातील "दाभोळ" बंदर छत्रपती शिवरायांच्या ताब्यात आले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
४ फेब्रुवारी इ.स.१६७०
"गड आला पण सिंह गेला"
नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे हे लढता लढता धारातीर्थी पडले ते किल्ले कोंढाण्यावर भगवा फडकवूनच. ४ फेब्रुवारीला संध्याकाळी तानाजीने सर्व मावळ्यांसह राजगड सोडला व सर्वजण खिंडीत येऊन पोचले. मध्यरात्रीनंतर सारे डोणागिरीच्या कड्याजवळ आले, २ मावळ्यांना तो कडा त्याच्या खाचाखोचासहीत माहीत होता.त्यातील "यशवंत घोरपडे" हे वीर कमरेला दोर बांधून कडा चढून वर गेले. ("यंशवंती" नावाची घोरपड नव्हती) त्यांच्या मागून वर येताना 6 मावळे खाली पडून मरण पावले.पण तेवढ्यात किल्लेदार "उदयभान राठोड" ला खबर मिळाली की कोणीतरी दोर चढून वर येत आहे. तेवढ्यात "हर हर महादेव" चा एल्गार झाला व मराठे गनिमांवर तुटून पडले. उदयभान व तानाजी यांच्यात जोरदार युद्ध झाले, त्यात वार झेलत असताना तानाजींची ढाल तुटली व मर्मस्थानी लार बसून तानाजी धारातीर्थी पडले. तानाजी पडल्यावर मराठी सैन्यात चलबीचल झाली पण त्याच वेळी सुर्याजींनी मावळ्यांना धीर दिला मग त्वेषाने मराठे तुटून पडले व "शेलार मामा" नी उदयभान राठोड ला संपवला. मराठ्यांची फत्ते झाली, गड ताब्यात आला पण तानाजीसारखा सिंह मात्र गेला.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
  जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे
            जय गडकोट
        !! हर हर महादेव !!

     🚩 *शिवविचार प्रतिष्ठान* 🚩
*०४ फेब्रुवारी इ.स.१६६०*
कोकणातील "दाभोळ" बंदर छत्रपती श्री शिवरायांच्या ताब्यात आले.
*०४ फेब्रुवारी इ.स.१६७०*
*"गड आला पण सिंह गेला"*
*नरवीर तानाजी मालुसरे* हे लढता लढता धारातिर्थी पडले ते किल्ले कोंढाण्यावर भगवा फडकवूनच.०४ फेब्रुवारीला संध्याकाळी तानाजींनी सर्व मावळ्यांसह राजगड सोडला व सर्वजण खिंडीत येऊन पोहचले. मध्यरात्रीनंतर सारे डोणागिरीच्या कड्याजवळ आले,२ मावळ्यांना तो कडा त्याच्या खाचाखोचासह माहित होता. त्यातील *"यशवंत घोरपडे"* हे वीर कमरेला दोर बांधून कडा चढून वर गेले.(यशवंती" नावाची घोरपड नव्हतीच) त्यांच्या मागून वर येताना ६ मावळे खाली कोसळले व धारातिर्थी पडले. पण तेवढ्यात किल्लेदार "उदयभान राठोड" ला खबर मिळाली की, कोणीतरी दोर चढून वर येत आहे. तेवढ्यात *"हर हर महादेव"* चा एल्गार झाला व मराठे गनिमांवर तुटून पडले. उदयभान व तानाजी यांच्यात जोरदार युद्ध झाले, त्यात वार झेलत असताना, तानाजींची ढाल तुटली व मर्मस्थानी लार बसून धारातिर्थी पडले. तानाजी पडल्यावर मराठी सैन्यात चलबिचल झाली, पण त्याच वेळी सूर्याजींनी मावळ्यांना धीर दिला, मग त्वेषाने मराठे तुटून पडले. *"शेलार मामा"* नी उदयभान राठोडला संपवला.मराठ्यांची फत्ते झाली. गड ताब्यात आला पण तानाजींसारखा शूर सिंह मात्र गेला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या