Chatrapati Shivaji Maharaj (छत्रपती शिवाजी महाराज)
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आठ पत्नी होत्या. ते आपण खालील प्रमाणे बघू शकतात.
1) सईबाई-निंबाळकर घराणे
2) सोयराबाई-मोहिते घराणे
3)पुतळाबाई भोसले
4) काशीबाई-जाधव घराणे
5) सकवारबाई-गायकवाड घराणे
6)लक्ष्मीबाई-विचारे घराणे
7) गुणवंताबाई-इंगळे घराणे
8)सगुणाबाई-शिर्के घराणे
1.सईबाई भोसले (जन्म:- 29 ऑक्टोबर १६३३ –मृत्यू:-५ सप्टेंबर १६५९) या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी आणि छ्त्रपती संभाजी महाराजांच्या आई होत्या.
सईबाईंचे या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील माधोजीराव नाईक निंबाळकर यांच्या पुत्री होत. निंबाळकर तंजावरच्या पवार कुळातील घराणे आहे. सईबाई यांना तलवार बाजीची आवड होती. सईबाई यांचा विवाह शिवाजीमहाराजांशी लालमहाल येथे १६ मे १६४० रोजी झाला. त्यावेळी शिवाजी महाराजांचे वय ११ वर्षे तर सईबाईंचे वय ७ वर्षे होते. त्या शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी होत्या. त्यांनी वयाच्या २४व्या वर्षी १४ मे १६५७ रोजी संभाजी महाराजांना जन्म दिला. त्यानंतर सईबाईंची तब्येत बाळांतव्याधी मुळे खालावली. संभाजी महाराज दोन वर्षांचे असताना ५ सप्टेंबर १६५९ रोजी महाराणी सईबाईंचा मृत्यू झाला.
2.सोयराबाई भोसले छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी होत्या. या शिवाजी महाराजांचे सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भगिनी, छत्रपती राजाराम महाराजांच्या मातोश्री व छत्रपती संभाजी महाराज महाराजांच्या सावत्र आई होत्या. राजाराम महाराज हे त्यांचे पुत्र होते. शिवाजी महाराजांच्या नंतर राजाराम महाराज हे पुढचे छत्रपती व्हावेत अशी त्यांची इच्छा होती . १६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काही कनिष्ठांच्या मदतीने सोयराबाईंचा दहा वर्षांचा मुलगा राजाराम महाराज यांना रिक्त सिंहासनावर आला. तिचे सावत्र पुत्र आणि वारस छत्रपती संभाजी महाराज यांना सोयराबाईंचा भाऊ आणि सेना प्रमुख हंबीराव मोहिते यांच्या मदतीने गादीवरून काढून टाकण्यास सक्षम होते. छञपती संभाजी महाराज यांनी सोयाराबाईकडून सत्ता हस्तगत केल्यानंतर, तिने प्रत्येक साधन नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अष्टमंडळातील अनुयायांनी ऑगस्ट १६८१ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांना विषबाधा करण्याचा प्रयत्न केला, पण ते वाचले, आणि मंत्र्यांना व कट कारस्थाने करणाऱ्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवून मारण्यात आले. शिवरायांचा संशियित खून व राजाराम यांचा झालेला राज्याभिषेक चोरून लपून केला गेला. ही बातमी रायगडावरून फुटणार नाही याची दखल घेतली गेली. लगेच अष्टप्रधान मंत्र्यांनी संभाजीराजे यांना पकडण्याचे आदेशपत्र हंबीरराव मोहिते यांना दिले. पण हंबीरराव यांना शिवरायांनी खाजगीत संभाजी महाराजांना छत्रपती करा असे सांगितले होते. राजाराम हा दहा वर्षाचा आहे त्याला राजा करणे हे स्वराज्य अष्टप्रधान मंत्र्यांचे हातात देणे होईल, अशी सूचना शिवरायांनी पूर्वीच " राजारामाचे सख्खे मामा सेनापती हंबीरराव मोहिते " यांना केली होती. हंबीरराव यांना सोयराबाईंचे व मंत्र्यांचे पत्रं मिळताच त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना त्याची माहिती कळवली.
3.पुतळाबाई भोसले ह्या शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. पुतळाबाईंचा १५ एप्रिल १६५३ रोजी शिवाजी राजांंशी विवाह झाला. पुतळाबाई पालकर घराण्यातील होत्या. नेताजी पालकर हे पुतळाबाईंचे भाऊ होते. त्यांना मूल बाळ नव्हते.महाराणी पुतळाबाई या एक निष्ठावंत राणीसाहेब होत्या.महाराजांच्यानंतर स्वराज्याच्या जडणघडणीत त्यांनी मोठे योगदान दिले. महाराजांच्या इच्छेप्रमाणे संभाजी राजांकडे त्यांनी स्वराज्याचा कारभार सुखरूप सोपवला. त्यांचा मृत्यू रायगडावर झाला.
4.काशीबाईसाहेब भोसले (?? - इ.स. १६७४) ह्या छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या चौथ्या पत्नी होत्या. त्यांचा शिवाजी महाराजांशी विवाह ८ एप्रिल १६५७ रोजी झाला . त्यांचा मृत्यू इ.स. १९ मार्च १६७४ रोजी झाला. त्यांची समाधी रायगड येथे आहे.
0 टिप्पण्या