calendar

header ads

श्वेतप्रदर

श्वेतप्रदर 
======
https://youtu.be/LIED2YnCKWg
अंगावरून पांढरा स्त्राव जाणं म्हणजेच ल्यूकोरिया आणि यामुळेच योनीमार्गाचा बाहेरील भाग जास्त प्रमाणात ओला राहतो. हा पांढरा स्त्राव किंवा हा जादा ओलसरापणा कोणत्याही वयात होऊ शकतो. जन्माच्या पहिल्या दिवसापासूनही मुलीच्या अंगावर पांढर जात असल्याची उदारहरणं आढळत असतात. ज्या अर्भकाच्या अंगावर पांढरं जात असतं, तिची आई किंवा नर्स यांच्या ते लक्षात येऊ शकतं. चार पाच वर्षापर्यंतच्या मुलीच्या अंगावर जात असेल तर, तेही आई किंवा नर्सला समजू शकतं. कारण या वयापर्यंतच्या मुलीची अंघोळ, स्वच्छता त्याच करीत असतात. चौदा दिवसांपर्यंत ज्या मुलींच्या अंगावर जातं तो पांढरा स्त्राव जास्त चिकट असू शकतो. अर्थात हा स्त्राव लक्षात आल्यावर त्याची गंभीर दखल घेण्यासारखं काही नसतं. निर्जंतूक कापसाच्या बोळ्यानं तो अवयव स्वच्छ ठेवावा एवढी काळजी मात्र घ्यावी. इतर कोणत्याही उपचाराची आवश्यकता नाही. जवजात अर्भकाच्या अंगावर पांढरा स्त्राव जायचं कारण म्हणजे आईची हार्मोन्स अर्भकाच्या रक्तात मिसळतात.
स्त्रीच्या योनीतून स्राव होणे याला अंगावरून पांढरे पाणी जाणे असेही म्हंटले जाते. कित्येक महिलांना अंगावरून पाणी जाणं किंवा श्वेतपदराच्या समस्येला तोंड द्यावं लागतं. मात्र कित्येकदा याकडे महिला दुर्लक्षच करताना दिसतात. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास ही समस्या गंभीर रूप धारण करू शकते.
अंगावरून जाणारा पांढरा स्राव याविषयी माहिती असेल तर हा स्राव नैसर्गिक आहे की, आजारामुळे त्यात  काही बदल झाला आहे हे समजून घेता येईल.सगळ्याच स्त्रियांना योनीमार्गात ओलासर पणा जाणवतो. योनीतून झिरपणाऱ्या पाण्याला योनिस्राव किंवा पांढरे पाणी असे म्हणतात.
श्वेतप्रदर हा काही गंभीर आजार नाही. तर गर्भाशयाशी संबंधित ही समस्या असल्यानं मानलं जातं. ही समस्या सर्वसामान्यपणे महिलांमध्ये आढळते. त्यात योनीमार्गातून अंगावरून पांढरा स्रव बाहेर पडतो. त्यालाच अंगावरून पांढरं जाणे, पाणी जाणे किंवा श्वेतप्रदर असं म्हणतात. हा स्रव कधी कधी निळसर, पिवळा, दुधाप्रमाणे, गुलाबी, घट्ट आणि कधी कधी काळ्या रंगाचाही असतो. सर्वसाधारणपणे पांढरा-पारदर्शक स्रव बाहेर जातोच, मात्र वरीलप्रमाणे त्यात रंग दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे धाव घ्यावी. नाही तर हा आजार गंभीर आजाराचं स्वरूप धारण करतो.
या पाण्यामुळे योनी स्वच्छ राहते. स्वाभाविक ओल किंवा पांढरे पाणी आतील कपडे खराब करत नाही. आतील कपडे खराब होतील इतक्या प्रमाणात जर पांढरे पाणी जात असेल तर मात्र चिंता करण्यासारखी गोष्ट असते.

काही विशिष्ट परिस्थितीमध्ये नैसर्गिकरीत्या योनीतून थोडे जास्त पांढरे पाणी जाते. बीज बिजकोषातून बाहेर पडल्यावर (२४ ते २८ तास पाळीच्या मध्यावर), गरोदरपणी आणि लैंगिक संबंधाच्या वेळेस योनीतून पांढरे पाणी जास्त प्रमाणात जाऊन कपडे खराब होऊ शकतात. हे नैसर्गिक आहे यात चिंता करण्याचे काहीही कारण नाही. मानसिक त्रास, रक्तपांढरी (रक्त कमी झाल्यामुळे) , झोप येत नसल्यास, असंतुलित आहार यामुळे सुद्धा अंगावरून नेहमीपेक्षा थोडे जास्त पांढरे पाणी जाऊ शकते.

काही वेळा मात्र अति प्रमाणात अंगावरून पांढरे जाते. यामुळे आतील आणि काही वेळा बाहेरचे सुद्धा कपडे ओले होतात. जंतूलागण झाल्याने असे आजार होऊ शकतात. अंगावरून नैसर्गिकरीत्या जाणाऱ्या पांढऱ्या पाण्याचा रंग आणि वास बदलल्यास आजाराचे लक्षण समजून त्यावर उपचार घेतले पाहिजेत. स्वतःच्या नैसर्गिक स्त्रावाचा वास आपल्या परिचयाचा असतो. नेहमीपेक्षा वेगळा दुर्गंधीयुक्त वास असल्यास आजाराच लक्षण समजून त्यावर उपचार केले पाहिजेत.
पाच वर्षांवरची मुलगी, पांढरा स्त्राव होऊ लागला, तर त्याबद्दल आईला सांगू शकते. परंतु तरीसुद्धा वयाच्या बारा वर्षांपर्यंतच्या काही मुलींना डॉक्टरांकडे नेलं जातं. कारण या वयातही बऱ्याच मुली अशा स्त्रावाबद्दलची तक्रार करीत नाहीत. वाढत्या मुलींच्या बाबतीत असा स्त्राव जाऊ लागला तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक ठरतं. डॉक्टरांनी पूर्णपणे आतून तपासणी करणही काही वेळा आवश्यक असतं. शाळेतील मोठ्या मुली  आणि लग्नाच्या आधीच्या मुली अंगावर जास्त पांढर जाण्याबद्दल तक्रार करतात. त्याची, लग्न झालेल्या स्त्रियांची तपासणी जशी करतात, तशी तपासणी करून घेणं आवश्यक आहे. पांढरं जाण्याची काही कारणं लग्न झालेल्या आणि अविवाहित स्त्रियांच्या बाबतीत सारखी असू शकतात.
लैंगिक अवयावासंबधी त्रास किंवा आजराविषयी बोलण्याची लाज वाटल्यामुळे त्यावर उपचार घेतले जात नाहीत. पण लाज वाटून, लपवून हे आजार बर होणार नाहीत. शरीराच्या इतर आजारांप्रमाणेच हेही आजार आहेत. त्यावर उपचार होऊ शकतात. त्यामुळे न घाबरता आपल्या त्रासाविषयी बोला आणि मदत घ्या.
जास्त स्त्राव केव्हा होतो ?
=================
कधी जास्त प्रमाणात अंगावर जाउ लागतं. तेही तसं त्यावेळेपुरतं नॉर्मलच असतं. हा काळ म्हणजे –
(१) वयात आल्याबरोबरचा काळ.
(२) मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी किंवा बंद होण्यापूर्वीचा काळ.
(३) दोन पाळ्यांमधील दोनतीन दिवसांचा काळ, यातला स्त्राव चिकट असतो.
(४) लैंगिक भावना उद्दीपित झाल्यावर किंवा समागम झाल्यानंतरचा काळ.
(५) गर्भारपणाचा काळ.
(६) बाळंतपणानंतरचा २ ते ४ आठवड्यांचा काळ ( म्हणजेच रक्तस्त्राव थांबल्यावर )
या काळातील अंगावर जाण्याचं प्रमाण जास्त नसेल तर काळजी करण्याचं कारण नाही.

 लक्षणं
=====
योनीमार्गातून पांढरा, चिकट स्रव बाहेर पडणं
 योनीमार्गात खाज येणं
 कंबर दुखणं
 चक्कर येणं
 अशक्तपणा जाणवणं
बद्धकोष्ठतेचा त्रास होणे
 डोकं दुखणे
 पोट फुगणे.

अंगावर जाण्याचं स्वरूप- म्हणजे कमी जास्त प्रमाण, कमी अधिक चिकटपणा, रंग स्त्रीनं डॉक्टरांना अचूक सांगण आवश्यक आहे. स्त्राव कधी पातळ, तर कधी चिकट, घट्ट, बारीकबारीक कणांच्या स्वरूपातही असू शकतो. अंगावर जात असताना इतर आणखी काही लक्षणे दिसत असतात. घाण वास येणं, कंबर दुखने, योनीमार्गाची जळजळ होणं, टोचत राहणं, योनी मार्गाच्या बाहेरचा भाग काहीवेळा ओला झालेला व सुजलेला आढळतो. अशा तऱ्हेच्या तक्रारी अचानक उद्भवतात असं वाटलं, तरी बहुतेकवेळा त्या खूप जुन्हाही असू शकतात. योनीमार्ग किंवा गर्भाशयमुखाशी जंतुसंसर्ग झाल्यामुळं अंगावर पांढरं जात असतं हे जंतू अत्यंत सूक्ष्म असतात. त्यात बुरशीचे जंतूही असतात हे जंतू एकमेकीत पसरायला वेळ लागत नाही. अस्वच्छ संडास, कमोड्स, मोरी किंवा एकच टॉवेल वापरणे यामुळे हे जंतू एका स्त्रीकडून दुसऱ्या स्त्रीकडे जायला वेळ लागत नाही. समागमामुळेही हे जंतू पसरू शकतात आणि जंतूंचा प्राडूर्भाव वरचेवर होत राहतो. पुरुषातही हे जंतू जातात, पण सामान्यतः त्याची काहीच तक्रार नसते. बाळंतपणात योगीमार्ग योग्यपणे शिवला गेला नाही तर हे जंतू सहजपणे स्त्रीच्या शरीरात प्रवेश करू शकतात. वाढत्या वयाच्या मुली आणि वयस्कर स्त्रियांकडून या अवयवांची नीट स्वच्छता राखली गेली नाही तर त्यांना या जंतूंचा बालपणीच संसर्ग होऊ शकतो. यासाठीच मुलांना गुदद्वार पुढच्या बाजून मागच्या बाजूला हात नेऊन धुण्याची शिकवण द्यावी. मागून, पुढे गुदद्वार धुण्याची पद्धत अयोग्य आहे. त्यामुळे मल कण पुढील भागात येऊन मूत्राशयात, योनीमार्गात जाण्याची शक्यता असते. योनीद्वारात जंतूंचा विशेषतः बुरशीच्या जंतूंचा संसर्ग हा सर्वसामान्यपणं गर्भारपणात होतो. तसंच मधुमेह असलेल्या स्त्रियांना किंवा लघवी वाटे साखर जाणाऱ्या स्त्रियांना होऊ शकतो. गर्भाशयाच्या मुखाचा जंतू संसर्ग गुप्तरोगामुळे होऊ शकतो. पेशंटनं जर सविस्तरपणे सर्व लक्षणं डॉक्टरांना सांगितली तर डॉक्टर तपासणी करून नेमकं  कारण ठरवू शकतात. त्यामुळे त्यावर योग्य तो उपचारही करता येतो.

कारणं
====
थंडी वाजल्याने
शरीराची स्वच्छता न राखल्याने
गर्भाशयाला सूज येणं,
 वारंवार गर्भपात करणं,
 अधून मधून अंगावरून रक्त जाणं,
अधिक मसालेदार पदार्थाचं सेवन करणं..
गर्भाशयाच्या गाठी,गर्भाशयाचा कॅन्सर ,पॉलीप ,बीजकोशाचा टुमर,अंग बाहेर येणे,,मानसिक ताण तणाव...

धोक्याचा इशारा केव्हा
==============
योनी मार्गात खूप खाज सुटणे ,आग जळजळ होणे .
स्त्रावाला घाण वास सुटणे ,स्त्रावाचा रंग पिवळा किवा  हिरवा होणे .
ताप येणे .

काय काळजी घ्यावी?
==============
दररोज योनीमार्गाची स्वच्छता राखणं आवश्यक असतं.
 प्रत्येक वेळी मूत्रविसर्जनानंतर ती जागा स्वच्छ पाण्याने धुणं आवश्यक आहे.
 शरीरसंबंधांनंतरही स्वच्छता राखणं आवश्यक आहे.
मधुमेह वगैरेसारखे विकार ताब्यात ठेवणे अत्यावश्यक आहे.

काहीवेळेस महिला फक्त पांढरं जातं आहे म्हणून दुर्लक्ष करतात. त्यांचे  पडणाऱ्या डागाकडे लक्ष नसते. त्यात रक्ताचाही अंश असण्याची शक्यता असते, ते केवल पांढरं जाणं नसतं.  जर स्त्रावातून रक्ताचा अंश जात असेल तर गर्भाशयाच्या कॅन्सरची दाट शक्यता असते आणि त्या डागांकडे बऱ्याच काळपर्यंत दुर्लक्ष झाल्यामुळं हा कॅन्सर प्रगत आणि बरा न होण्याची पायरी गाठतो. नेहमीपेक्षा केवळ जास्त प्रमाणात अंगावर जात आहे अशी समजूत स्त्रियांची होत असल्याने कॅन्सर प्राथमिक अवस्थेत उघडकीला येऊ शकत नाही आणि म्हणूनच प्रत्येक स्त्रीनं याक्डे दुर्लक्ष न करणं तिच्याचं हिताच आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या